आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss Winner Prince Narula Bride To Be Yuvika Chaudhary Goes Parlor For Beauty Sessions Before Two Days Of Wedding

Wedding Bells: लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी पार्लरमध्ये दिसली 'बिग बॉस' विनर प्रिन्सची भावी पत्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस-9'चा विजेता प्रिन्स नरूला 12 ऑक्टोबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री युविका चौधरीसोबत प्रिन्स विवाहबद्ध होतोय. दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान प्रिन्सची भावी पत्नी युविका बुधवारी पार्लरमध्ये पोहोचली होती. हळद आणि मेंदी सेरेमनीपूर्वी तिने हाता-पायांच्या नखांचे क्लिनिंग करुन घेतले. 11 ऑक्टोबरपासून दोघांच्या लग्नविधींना सुरुवात होतेय.


मुंबईत होणार लग्न...

- दोघांचे लग्न मुंबईत होणार आहे. प्री वेडिंग फंक्शनमध्ये हळद, मेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहेत. 21 ऑक्टोबर रोजी प्रिन्सच्या होमटाऊन चंदीगड येथे रिसेप्शन पार्टी होणार आहे.

 

- दोघांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका एका व्हॅनिटी बॉक्ससारखी आहे. ब्लू , ग्रे आणि गोल्डन रंगाने हे कार्ड सजवण्यात आले आहे. खास गोष्ट म्हणजे, बॉक्समध्ये लग्नाचे कार्ड, श्रीगणेशाची गोल्डन कलरची एक मुर्ती आणि एक फोटो फ्रेम आहे.


- प्रिन्स आणि युविकाची भेट 'बिग बॉस 9' या रिअॅलिटी शोमध्ये झाली होती. त्यानंतर दोघे 'स्पिल्ट्सविला एक्स'मध्येही एकत्र झळकले होते.


- प्रिन्सपूर्वी युविका 'एफआईआर' या मालिकेत झळकलेला अभिनेता विपूल रॉयसोबत 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. मग दोघे वेगळे झाले. विपूलने एका मुलाखतीत म्हटले होते, "ब्रेकअपनंतरही मी आणि युविका चांगले मित्र आहोत आणि ही गोष्ट सिद्ध करण्याची आम्हाला गरज नाहीये."

 

बातम्या आणखी आहेत...