आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bigg Boss Winner Prince Narula Engagement With Actress Yuvika Chaudhary Couple Dance In Mehendi Ceremony: TV Actress Rashmi Desai And Kishwer Merchant Attend

प्रिन्सचा साखरपुडा : 'बिग बॉस' विनरने भावी वधूसोबत धरला ताल, कुटुंबीयांनी उडवल्या 500-2000च्या नोटा, : Inside Photos, Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस-9' चा विजेता आणि अभिनेता प्रिन्स नरुला आणि याच सीजनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली युविका चौधरी यांचा साखरपुडा झाला आहे. बुधवारी मुंबईत या दोघांचा साखरपुडा झाला. त्यानंतर युविकाच्या हातावर मेंदी काढण्यात आली. मेंदी सेरेमनीत ढोलताश्यांवर वर-वधू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ताल धरला होता. प्रिन्स आणि युविकाचा डान्स बघून कुटुंबीयांनी  500, 2000 च्या नोटा उडवल्या. या सेरेमनीत टीव्ही शो 'उतरन' फेम रश्मी देसाई पोहोचली होती. मेंदी सेरेमनीच्या वेळी युविका ग्रीन कलरचा स्कर्ट लहंगा, फ्लॉवर ज्वेलरीत दिसली. तर प्रिन्स व्हाइट कलरच्या कुर्ता-पायजामात दिसला. साखरपुड्याला युविकाने रेड कलरचा लाँग गाऊन परिधान केला होता. 


साखरपुड्याला पोहोचली प्रिन्सची मानलेली बहीण...

- प्रिन्सच्या साखरपुड्याला त्याची मानलेली बहीण आणि 'बिग बॉस' कंटेस्टेंट किश्वर मर्चेंटसुद्धा पोहोचली होती. यावेळी ती युविकासोबत फोटो क्लिक करताना दिसली.
- किश्वर यावेळी एकटी पोहोचली होती. तिचा पती आणि अभिनेता सुयश राय यावेळी दिसला नाही.
- 'बिग बॉस सीझन-9' मध्ये किश्वर-सुयश आणि प्रिन्स-युविका  स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. शोमध्ये प्रिन्स आणि युविकाची मैत्री झाली. तर किश्वरला तो बहीण मानू लागला.
 - शोमधून बाहेर आल्यानंतर सुयश आणि किश्वर यांनी काही काळ लिव्ह इनमध्ये राहून लग्न थाटले. प्रिन्सने लग्नात किश्वरला लग्नाचा लहेंगा गिफ्ट केला होता.


मुंबईत होणार लग्न... 

- दोघांचे लग्न मुंबईत होणार आहे. प्री वेडिंग फंक्शनमध्ये हळद, मेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहेत. 21 ऑक्टोबर रोजी प्रिन्सच्या होमटाऊन चंदीगड येथे रिसेप्शन पार्टी होणार आहे.
- दोघांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका एका व्हॅनिटी बॉक्ससारखी आहे. नीळा, ग्रे आणि गोल्डन रंगाने हे कार्ड सजवण्यात आले आहे. खास गोष्ट म्हणजे, बॉक्समध्ये लग्नाचे कार्ड, श्रीगणेशाची गोल्डन कलरची एक मुर्ती आणि एक फोटो फ्रेम आहे.
- प्रिन्स आणि युविकाची भेट 'बिग बॉस 9' या रिअॅलिटी शोमध्ये झाली होती. त्यानंतर दोघे 'स्पिल्ट्सविला एक्स'मध्येही एकत्र झळकले होते.
- प्रिन्सपूर्वी युविका 'एफआईआर' या मालिकेत झळकलेला अभिनेता विपूल रॉयसोबत 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. मग दोघे वेगळे झाले. विपूलने एका मुलाखतीत म्हटले होते, "ब्रेकअपनंतरही मी आणि युविका चांगले मित्र आहोत आणि ही गोष्ट सिद्ध करण्याची आम्हाला गरज नाहीये."

बातम्या आणखी आहेत...