आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणाच्या १३ मिनिटांतच विमान कोसळले; १८८ ठार: इंडोनेशियातील हा सर्वात मोठा विमान अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता - इंडोनेशियातील जकार्ताहून पंगकल पिनांगकडेे जाणारे लॉयन एअरलाइन्सचे विमान सोमवारी जावा समुद्रात कोसळून १८८ जणांचा मृत्यू झाला. विमानात ३ मुलांसह १८१ प्रवासी, २ वैमानिक व ५ इतर क्रू सदस्य हाेते. ही घटना जकार्ताहून ५२ किमीवरील केरवांग येथे घडली. तेथे समुद्र फक्त ३० मीटर खोल आहे. दिल्लीचे वैमानिक भव्य सुनेजा (३१) ते उडवत होते. हा इंडोनेशियातील सर्वात मोठा विमान अपघात आहे. याआधी २०१४ मध्ये एअर एशिया अपघातात १६२ जण ठार झाले होते. 


जकार्ताच्या सोएकर्णो हट्टा इंटरनॅशनल एअरपोर्टहून सकाळी ६.१७ ला विमानाने उड्डाण केले. १३ व्या मिनिटालाच विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. तेव्हा ते ३,६५० फूट उंचीवर उडत होते. त्याचा वेग ३४५ नॉटिकल माइल्सपर्यंत वाढला होता. सुनेजा यांनी विमान परत लँड करण्याची परवानगी एटीसीकडे मागितली. ती देण्यातही आली. मात्र विमान परतले नाही.

 

भव्य सुनेजा २०११ पासून करत होते काम 
वैमानिक भव्य सुनेजा दिल्लीचे आहेत. ते मार्च २०११ पासून लॉयन एअरलाइन्समध्ये काम करत होते. ते पत्नीसह जकार्ताला राहत हाेते. त्यांना ६ हजार तासांचा उड्डाण अनुभव होता.

 

कंपनीचा इतिहास चांगला नाही, युरोपात ब्लॅकलिस्ट
सुरक्षेच्या कारणावरून लॉयन एअरलाइन्स युरोपात ९ वर्षांपासून ब्लॅकलिस्टेड आहे. २०१३ मध्ये याच कंपनीचे विमान बालीत समुद्रात लँड झाले होते. २००४ मध्ये याच कंपनीचे विमान सोलो सिटीत क्रॅश लँड झाले. त्यात २५ जणांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...