आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दयेची भीक मागत होती विद्यार्थिनी, पण चार नराधमांनी पार केल्या सर्व सीमा; व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर केला व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जहानाबाद : सोशल मीडियावर क्रुरपणाचा आणखी व्हिडिओ समोर आला आहे. बिहार राज्यातील जहानाबाद येथील हा व्हिडिओ आहे. येथे 4 नराधमांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर जबरदस्ती केली. आरोपींनी स्वतः हा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला आहे. 

 

> सदर घटना राजधानी पाटणापासून काही अंतरावरील मखदुमपूर येथील डोंगराळ भागात घडली आहे. SDOP पीबी श्रीवास्तव यांच्या मते, व्हिडिओच्या आधारे एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. इतर तिघांना पकडण्यासाठी पोलिस छापेमारीची कारवाई करत आहेत. 

 

> पीडिता आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी आली होती. दरम्यान आरोपी तेथे दाखल झाले आणि त्यांनी पीडितासोबत दुर्व्यवहार केला. गावगुंड कशाप्रकारे विद्यार्थिनीसोबत जबरदस्ती करत आहेत ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 

> मुलगी आरोपींकडे दयेची भीक मागत होती. पण नराधमांन मात्र हसत हसत तिच्या अब्रूशी खेळत होते. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींविरोधात पोक्सो अॅक्टअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...