आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - लोकसभेत सोमवारी बजेट भाषणासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्या वेळी बिहारच्या सारणचे लोकसभा खासदार राजीव प्रताप रुडी यांनी आपल्याच सरकारवर दुर्लक्षाचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘आशियातील सर्वात मोठा पशू मेळा सोनपूर आणि सारणमध्ये गंगा, गंडक आणि घाघराच्या संगम स्थळावर डॉल्फिन क्षेत्र इको-टुरिझमच्या रूपात विकसित करायचे आहे. त्यासाठी केंद्राकडे तीन वर्षांपासून निधी मागत आहे, पण दर वेळी नवा नियम दाखवला जात आहे.’ केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी उत्तरात सांगितले की, बिहार सरकारकडून डीपीआर मिळाला नाही. त्यावर रुडींनी कागदपत्रे दाखवली आणि हे विशेषाधाकाराचे प्रकरण आहे, अशी टिप्पणी केली.
आधारला ऐच्छिक करणारे विधेयक मंजूर
राज्यसभेत बँक खाते उघडणे, मोबाइलचे सिम घेण्यासाठी ‘आधार’ला ऐच्छिक बनवण्यासंबंधाचे विधेयक २०१९ ला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, लोकसभेत सरकारने एक तासात ग्राहक संरक्षण विधेयसकासह आठ विधेयके सादर केली.
टोला : हे त्रिशंकू बजेट, ते कोणासाठीही नाही : काँग्रेस
बजेटवरील चर्चेत काँग्रेसचे नेते शशी थरूर म्हणाले की, त्यात केंद्र सरकारच्या चुका दिसतात. हे त्रिशंकू बजेट आहे, ते कोणासाठीही नाही.
आरोप: गुंतवणुकीद्वारे सरकार देशाला विकत आहे :
तृणमूल तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, केंद्र देशाची संपत्ती विदेशी कंपन्यांना विकत आहे. हेच केंद्र सरकारचे गुंतवणूक धोरण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.