आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar CM Nitish Kumar On Prashant Kishor And Pawan Varma Can Go And Join Any Party

भाजपवर टीका करणाऱ्या प्रशांत किशोर, वर्मांवर बरसले नितीश कुमार; वाट्टेल त्या पक्षात जा, माझ्याकडून शुभेच्छा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि एनआरसीवरून भाजपवर टीका करून चर्चेत असलेले प्रशांत किशोर यांना बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली आहे. जदयू नेते प्रशांत किशोर आणि पवन वर्मा गेल्या काही दिवसांपासून जदयूचा सहकारी भाजपवर टीका करत आहेत. त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना नितीश कुमार म्हणाले, तुम्हाला जदयू सोडून कुठल्याही पक्षात जायचे असेल तर जा, माझ्याकडून शुभेच्छा! हे लोक विद्वान आहेत. ते माझा मान ठेवत नसले तरीही मी त्यांचा आदर करतो असा टोला देखील नितीश कुमार यांनी लगावला आहे.

मनात काही असल्यास माझ्याशी चर्चा करा...

मोजक्या लोकांच्या विधानांवरून जदयूकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू नये. जनता दल युनायटेड (संयुक्त जनता दल) खंबीरपणे आपली कामगिरी करत आहे. आमची भूमिका नेहमीच स्पष्ट असते. कुठल्याही मुद्द्यावर आमच्यात संभ्रम नसतो. कुणाच्याही मनात शंका असेल तर त्यांनी थेट माझ्याशी चर्चा करावी. ते पक्षाच्या बैठकीत सुद्धा आपले म्हणणे मांडू शकतात.

प्रशांत किशोर यांनी अमित शहांना दिले होते आव्हान

जदयूचे उपाध्यक्ष आणि निवडणूक तज्ज्ञ प्रशांत किशोर गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीका करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते, की नितीश कुमार बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाहीत. एवढेच नव्हे, तर प्रशांत यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान दिले होते की बिहारमध्ये त्यांनी सांगितलेल्या क्रोनोलॉजीनुसार सीएए आणि एनआरसी लागू करून दाखवावे. तर दुसरीकडे, जदयूचे आणखी एक नेते आणि माजी खासदार पवन वर्मा यांनी सीएएवर पक्षाच्या निर्यणयाविरुद्ध नितीश कुमारांना पत्र लिहिले होते. पवन वर्मा म्हणाले होते, की नितीश कुमार यांना एनआरसी आणि सीएएसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. परंतु, नितीश कुमारांनी माझ्या पत्राचे उत्तर दिले नाही. त्यांचे उत्तर मिळाल्यानंतरच पक्षात राहणार की सोडणार यावर निर्णय घेईन.

बातम्या आणखी आहेत...