आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Accidental Prime Minister: Bihar Court Orders To Register FIR Against Anupam Kher And 13 Others

द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर/ अनुपम खेरसोबतच 14 लोकांविरुध्द एफआयआरचा आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. 'द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' चित्रपटामुळे अभिनेते अनुपम खेर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका याचिकेची सुनावणी करताना बिहारच्या एका कोर्टाने अनुपम आणि इतर 13 जणांविरुध्द एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अनुपम खेर यांनी या चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चित्रपट वादात अडकला आहे. 


गूगल, यूट्यूब वरुन ट्रेलर डिलीट करण्याची मागणी 
1. दिल्ली हायकोर्टातही 'द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर'विरुध्द याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत ट्रेलरमुळे 416 कलमेचे उल्लंघन झाल्याचे सांगण्यात आले आहे. यानुसार, कोणत्याही जिवंत व्यक्तीचे हुबेहूब व्यक्ती बनवण्याची परवानगी नाही. ट्रेलर गूगल, यूट्यूब आणि इंटरनेटवरुन डिलीट करण्याची मागणी केली जात आहे. 


2. कोर्टाने दिल्लीची फॅशन डिझायनर पूजा महाजनची याचिका सोमवारी फेटाळली होती. जस्टीस विभु बखरु यांनी त्यांना डिव्हिजनल बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला होता. 

 

ट्रेलरमध्ये मनमोहन सिंह यांच्या आयुष्यातील चढउतार 
3. हा चित्रपट मनमोहन सिंह यांच्यावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये ते पंतप्रधान झाल्यानंतरच्या आयुष्यात आलेल्या चढउतार दाखवण्यात आले आहेत. सोनिया गांधी यांची भूमिका जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नेट आणि राहुलची भूमिका अर्जुन माथुरने साकारली आहे. अहाना कुमारा प्रियांका गांधी आणि दिव्या सेठ मनमोहन सिंहची पत्नी गुरशरण कोरच्या भूमिकेत आहे. 

बातम्या आणखी आहेत...