आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

..तर नोकरीसाठी बिहारी चंद्रावरही जाईल; पत्रकारांच्या प्रश्नावर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी संतप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> सभेला गर्दी जमण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा म्हणजे प्रियंका चोप्रा नव्हे, मोदींनी काढला चिमटा  
> शत्रुघ्न सिन्हा यांना पाटण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे मोदींचे आव्हान


नागपूर- "राहुल गांधी खोटारडे आहेत', "शत्रुघ्न सिन्हा म्हणजे प्रियंका चोप्रा थोडीच आहेत गर्दी जमायला', "आप पत्रकार हो की विपक्ष के कार्यकर्ता?', "नोकरी के लिए बिहारी चाँद पर भी जायेंगे', "बिहारीओं ने बाहर जाना बंद किया तो देश के कारखाने बंद हो जायेंगे', "नहीं देना हमें आप के सवाल का जवाब', "कुछ भी सवाल पुछते हो आप, ये सवाल थोडे ही है?', "आप के सवाल का जवाब देने के लिए आप मुझे बाध्य करोगे क्या?', "आपने वो लेटर पढा है क्या?', "एक बार कह दिया न आपके सवाल का जवाब नहीं देंगे...', बिहारी लाेकांच्या एका प्रश्नावर अशी संतप्त प्रतिक्रिया बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी शुक्रवारी नागपुरात दिली.

 

"भारत के मन की बात, मोदी के साथ' या नव्या प्रचार अभियानाची माहिती देण्यासाठी नागपुरात आले असता महाल येथील भाजप कार्यालयात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली असता अनेक वेळा सुशीलकुमार मोदी यांनी संयम गमावला. मात्र, त्यावर पत्रकार आक्रमक झाल्याने नंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. 

 

2014 मध्ये भाजपने जाहीरनामा जाहीर केला होता. मात्र, या वेळी आम्ही संकल्पपत्र जाहीर करणार असून त्यासाठी भाजप जनतेत जाऊन विचार ऐकणार आहे, हे सांगण्यासाठी हा वार्तालाप होता. जनतेच्या सूचना, इच्छा-आकांक्षाचे प्रतिबिंब संकल्पपत्रात राहील. त्यासाठी 300 प्रचाररथ देशभर फिरणार आहेत. आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्याच्याआधी संकल्पपत्र तयार झालेले असेल.
 
बिहारींना महाराष्ट्र कोणीही रोखू शकत नाही
बिहारमधून सर्वत्र होणाऱ्या स्थलांतराबद्दल खूप प्रश्न आले. बिहारींमुळे स्थानिकांच्या रोजगारामुळे गदा येते. त्यावर जास्तीच्या कमाईसाठी बाहेर जाणे हा बिहारींचा स्वभावच आहे. उद्या चंद्रावर रोजगार आणि नोकरीच्या संधी निर्माण झाल्या तर तिथेही बिहारी जातील, असे ते म्हणाले. बिहारी माणूस कष्टाळू, मेहनती व प्रामाणिक आहे. जिथे जाईल तिथे मिसळून राहतो, असे सांगतानाच बिहारी माणसाने बाहेर जाणे बंद केले तर देशातील कारखाने बंद पडतील, असा इशाराही मोदींनी दिला.

 

रोजगार, व्यापार वा नोकरीसाठी कोणी, कुठेही जाऊ शकतो. त्यावर कोणीही बंदी घालू शकत नाही. गुजरात व पंजाब अतिशय संपन्न व समृद्ध प्रांत आहेत. मात्र, गुजरातमधून कॅनडा व यूकेत, तर पंजाबमधून कॅनडात सर्वाधिक लोक जातात. आज प्रत्येक पंजाबी माणसाचे कॅनडात एक घर आहे. महाराष्ट्रातील काही पक्षांचा भलेही विरोध असेल, पण बिहारींना महाराष्ट्रात येण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असे मोदींनी ठणकावले. सभेला गर्दी जमण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा म्हणजे प्रियंका चोप्रा नव्हे, असा चिमटा काढत सिन्हा यांना पाटण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान मोदी यांनी दिले. सिन्हा यांची लोकप्रियता आता ओसरली आहे. सभेला होणारी गर्दी आपल्यामुळेच आहे, या गैरसमजातून शत्रुघ्न सिन्हा लवकर बाहेर पडले तरे बरे...असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...