आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप अखेर निश्चित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - घटक पक्षांमध्ये दीर्घकाळ सुरू असलेल्या शाब्दिक युद्धानंतर महाआघाडीने बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सर्व ४० जागांचे वाटप शुक्रवारी निश्चित केले. त्यानुसार, राजदच्या नेत्या मिसा भारती आणि अब्दुल बारी सिद्दिकी हे अनुक्रमे पाटलीपुत्र आणि दरभंगा येथून तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार या सासाराम मतदारसंघातून निवडणूक लढवतील.

 
जागावाटपाच्या सूत्रानुसार, राजदला २० जागा मिळाल्या आहेत, त्यातील एक जागा हा पक्ष भाकप (माले) ला देणार आहे. काँग्रेसला ९ तर उपेंद्र कुशवाह यांच्या रालोसपला पाच तसेच जितनराम मांझी यांचा ‘हम’ आणि मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पक्षाला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जागा वाटपाची घोषणा केली. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या वेळी उपस्थित नसल्याने पक्ष राजदवर नाराज असल्याचे 
चित्र होते.  


बेगुसराय मतदारसंघातून तेजस्वी यादव यांनी तनवीर हसन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाकपचे उमेदवार कन्हैयाकुमार हेही अडचणीत आल्याचे चित्र आहे. या मतदारसंघातून भाजपतर्फे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह निवडणूक रिंगणात आहेत.‘आमचे १८ उमेदवार निश्चित झाले आहेत. शेओहार मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल, तर आधी जाहीर केल्यानुसार आरा मतदारसंघ भाकप (माले) ला सोडला जाईल,’ अशी घोषणा तेजस्वी यांनी केली.  


तेजप्रताप यादव यांची समजूत काढण्यासाठी शेओहार मतदारसंघातून राजदने उमेदवार जाहीर केला नाही, असे म्हटले जात आहे. तेजप्रताप यांनी गुरुवारीच राजदच्या विद्यार्थी शाखेच्या संरक्षक पदाचा राजीनामा दिला होता. तेजप्रताप यांनी शेओहार आणि जेहानाबादमधून आपले समर्थक अंगेशकुमार आणि चंद्रप्रकाश यांच्या नावांचा आग्रह धरला होता.  दरम्यान, राजदने दरभंगातून अब्दुल बारी यांचे नाव जाहीर केल्याने भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या कीर्ती आझाद यांचा पत्ता कट झाल्याचे चित्र दिसत आहे. ते येथील विद्यमान 
खासदार आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...