आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारचे मुद्दे निवडणूक रिंगणाबाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील सहा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे राज्यात कुठे ना कुठे बदलाचे वारे वाहतेय याची जाणीव होत आहे. नक्षलग्रस्त भागात लोक निर्भय होऊन मतदान केंद्रावर पोहोचले ते पाहून मतदारांनी निश्चितच मनाशी खूणगाठ बांधल्याचे दिसते. या सहा मतदारसंघामध्ये सासाराममधून लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार आणि औरंगाबादमधून केरळचे राज्यपालपद सोडणारे निखिल कुमार कडव्या लढतीत अडकले आहेत. तिकीट वाटपावेळी काँग्रेसच्या या दोन जागा जिंकण्याच्या स्थितीत होत्या, मात्र मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे विजय एवढा सोपा होईल असे वाटत नाही.

उत्तर भारतात सुरू असलेला भाजपचा प्रचार आणि बिहारमधील मोदींच्या प्रचारात मोठे अंतर आहे. नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये 40 आणि उत्तर प्रदेशात 80 जागांवरील प्रचारातून देशात निवडणूक प्रचार मॉडेल उभे केले. येथे भाजप मागे आणि मोदी आघाडीवर आहेत. तुम्हाला वाटेल असे कसे? बिहारच्या शहरी, ग्रामीण भागातील चौका-चौकात, सकाळ-संध्याकाळ सभा होत आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही. बिहार, उत्तर प्रदेशसाठी विशेष नमो रथ तयार केला आहे. यामध्ये 64 इंच स्क्रीनचा एलईडी बसवण्यात आला आहे. यावर मोदी यांचे आक्रमक भाषणे सुरूच असतात. बिहारमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात नियोजन केले आहे. भाजप शासित राज्यांमध्ये पोस्टर्सवर मोदींबरोबर मुख्यमंत्री आहेत, बिहारमध्ये मात्र केवळ मोदी आहेत.

सत्तारूढ नितीश सरकार राज्यात आतापर्यंतची सर्वात मोठी परीक्षा देत आहे. नितीश यांच्या निशाण्यावर मोदींसोबत लालूंचा 15 वर्षांचा शासनकाळ आहे. यातून ते लालूंना निवडून देण्याचे धोके त्याचबरोबर मोदींचे साइड इफेक्टही समजावून सांगितले जात आहेत. चारा घोटाळा भोवल्यामुळे लालू निवडणूक लढू शकत नाहीत. त्यांनी पत्नी राबडीदेवी यांना सारण आणि मुलगी मिसा यांना पाटलीपुत्रमधून उतरवले आहे. सारणमध्ये राबडी यांना भाजप नेते राजीव प्रतापसिंह रुडी यांनी आव्हान दिले आहे. पाटलीपुत्रमध्ये लालू यांचे हनुमान संबोधले जाणारे रामकृपाल यादव यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. राजदचे हे दोन पारंपरिक मतदारसंघ तेवढे सोपे राहिले नाहीत.
बिहारमध्ये सोनिया, राहुल यांच्या सात-आठ सभा सोडल्या तर संपूर्ण राज्यात पक्ष लढतीत दिसत नाही. राजद-काँग्रेस आघाडी एकत्र लढत असले तरी राजदच्या सभांना काँग्रेस नसते तर काँग्रेसच्या सभांना राजद नेत्यांची पाठ असते. एकत्र न प्रचार करण्यात त्यांच्या आपापल्या अडचणी आहेत.

राज्याचा विकास आणि विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला प्रचार आता जातीयवाद विरुद्ध धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यात रूपांतरित झाला आहे. बिहारचे सर्व मुद्दे निवडणुकीत झाकले गेले आहेत. कोणता पक्ष बेरोजगारी, परराज्यात जाणारे लोंढे, भ्रष्टाचार, पायाभूत सुविधांचा अभाव आणि सुरक्षा यावर बोलायला तयार नाही.या सर्व मुद्द्यांचा पक्ष्यांच्या जाहीरनाम्यात श्वास कोंडला आहे. राज्यातील बुद्धिजीवींनी केलेल्या निवडणूक विश्लेषणात, भाजपने स्वत: विजयी ठरले आहे, नितीश पराभूत होण्यास तयार नाहीत, भविष्यात जदयूमध्ये फूट पडू शकेल. काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे जो दुसर्‍यांच्या कामगिरीत स्वत:चे यश पाहत आहे. बिहारमध्ये कोणी जिंकत असेल तर हारत कोणीच नाही हे खरे आहे.

ओम गौड
लेखक नॅशनल सॅटेलाइट एडिटर आहेत.