Home | National | Other State | Bihar ground report for loksabha election 2019

बिहार: रोम पोपचा, मधेपुरा गोपचा, प्रत्येक जागेवर जातीने मिळेल विजय

शशिभूषण | Update - Apr 21, 2019, 04:59 PM IST

फॅक्टर :पक्षातील नेते एकत्र, कार्यकर्ते नाही

 • Bihar ground report for loksabha election 2019

  ग्राउंड रिपोर्ट - सहरसामधून निघालेली जनसाधारण एक्स्प्रेस. रेल्वेत युवकांच्या टाेळीस निवडणुकीवर प्रश्न विचारताच ते म्हणाले, ‘पहले कमाई, फिर बटन दबाई।’ बटन दबाई म्हणजे ईव्हीएम. हे युवक गहू कापण्यासाठी पंजाबमध्ये जात हाेते. बिहारमधून राेजगारासाठी सर्वाधिक स्थलांतर हाेणारा काेसी नदीजवळील हा भाग आहे. मधेपुरा, सुपौल, अररिया, खगडियामध्ये राेजगार खूप कमी आहे. मधेपुरात इलेक्ट्रिक रेल्वे कारखाना २०१७ मध्ये सुरू झाला. बैजनाथपूरमध्ये पेपर मिलमध्ये मशीन आल्या, परंतु कारखाना सुरू झाला नाही.

  सहरसाला मधेपुराला जाेडणाऱ्या एनएच १०७ मार्गावरून २० किलोमीटर प्रवास करण्यासाठी दीड तास लागताे. यावरून येथील परिस्थिती लक्षात येते. या भागात मका चांगला येताे. सरकारने मक्याला १७०० रुपये हमीभाव दिला आहे. सहरसा जंक्शनला लागून असलेल्या बंगाली रेल्वेगुमटीवर आरआेबीचे तीन माजी रेल्वेमंत्री दिवंगत दिग्विजय सिंह, लालूप्रसाद व अधीर रंजन चौधरी यांनी उद्घाटन केले हाेते. सहरसामध्ये सात रेल्वे क्राॅसिंग आहेत. एकावरसुद्धा आरआेबी नाही. वाहतुकीची माेठी काेंडी हाेते. सहरसामधील समीर म्हणाले, ‘ हे प्रश्न काेणी उपस्थित करत नाही, हे दुर्दैव आहे. मतदान जातीय आधारावर केले जाते. बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यात ज्या पाच जागांवर मतदान हाेणार आहे, त्यातील चार जागा भाजपने आपल्या सहयाेगी पक्षाला दिल्या आहे. त्यातील अररियाची जागा भाजप लढत आहे.

  मागील निवडणुकीत मधेपुरा व सुपाैलमधील दाेन जागा पती-पत्नीने वेगवेगळ्या मतदारसंघातून जिंकल्या हाेत्या. राजद उमेदवार म्हणून राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव मधेपुरा येथून आणि सुपाैलमधून काँग्रेस उमेदवार म्हणून त्यांची पत्नी रंजित विजयी झाल्या हाेत्या. दाेघेही पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. पप्पू यादव राजदतून बाहेर पडले आहेत आणि शरद यादव जदयूत नाहीत. मधेपुरामध्ये मागील निवडणुकीत दाेघे समाेरासमाेर हाेते. दाेघांनी पक्ष बदलला आहेे. शरद यादव राजदकडून तर पप्पू यादव आपला पक्ष अधिकारी पार्टीकडून निवडणूक रिंगणात आहेत. एनडीएचे जदयू उमेदवार दिनेशचंद्र यादव यांनी ही लढत तिरंगी केली आहे. मधेपुरातसंदर्भात म्हटले जाते, ‘राम पाेपचा, तर मधेपुरा गाेपचा’ यादवांनी कृष्णाैत-मजराैटमध्ये विभाजन रेषा आेढली आहे. यंदाही त्यांचा हाच प्रयत्न आहे. खगडिया हा भाग केळी, मका आणि मिरचीच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे नद्या अशा पद्धतीने वाहत राहतात की राजा तोरडमलसुद्धा येथील नकाशा तयार करू शकला नाही. खगडियामध्ये मेगा फूड पार्क अपूर्ण आहे. पाच वर्षांत खगडियाला केवळ दाेन रेल्वेंचा थांबा व अपूर्ण फूड पार्क मिळाले.

  फॅक्टर :पक्षातील नेते एकत्र, कार्यकर्ते नाही

  एनडीएमधील जदयू-भाजप साेबत आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम), विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) व राष्ट्रीय लोकसमता पार्टी (रालोसपा) महाआघाडीत आल्यामुळे त्यांचा सामाजिक विस्तार झाला आहे. खरे तर विश्वासाची आेळख निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात हाेणार आहे. कारण राजकीय नेत्यांनी ज्या पद्धतीने खिचडी तयार केली, तशी तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये अजून नाही. यादव-मुस्लिम मतदार एकत्र असतील. इतर लहान-लहान जातींचे मतदारही जातींच्या नेत्यांकडून पाहून मतदान करतील, अशीच चिन्हे आहेत.

  मधेपुरा, अररियामध्ये कडवी लढत, तर सुपौल, झंझारपूरमध्ये जदयू आघाडीवर

  > मधेपुरामध्ये त्रिकाेणी तर सुपाैलमध्ये सरळ लढत आहे. सुपाैलमध्ये काँग्रेसचे रंजित रंगत लढत आहेत. मागच्या लाेकसभा निवडणुकीत दुसऱ्या स्थानावरचे जदयूचे उमेदवार दिलकेश्वर कामैतांनी उमेदवारीच्या घाेषणेआधीच जनसंपर्क सुरू केला हाेता. येथे अन्य काेणत्याही प्रभावी चेहऱ्याची चर्चा नाही.


  > खगडियामध्ये महाआघाडीच्या विकासशील इन्सान पार्टीचे(व्हीआयपी) मुकेश सहनी स्वत: मैदानात आहेत. लाेजपाचे चाैधरी मेहबूब अली कैसर पुन्हा रिंगणात आहेत. अररियामध्ये राजदचे सरफराज आलम आणि भाजपचे प्रदीप सिंह यांच्यात लढत आहे. मागील निवडणुकीत सिंह यांना पराभूत करून तस्लिमुद्दीन जिंकले हाेते.

  > झंझारपूरमध्ये त्रिकाेणी लढत आहे. राजदकडून आमदार गुलाब यादव, जदयकडून रामप्रीत मंडेल, माजी खासदार देवेंद्र प्रसाद यादव अपक्ष म्हणून लढत आहेत. गुलाब आणि देवेंद्र यादव यांचे हक्काचे मतदार एकच असल्याचा जदयू उमेदवारासाठी दिलासा आहे. या क्षेत्रात अति मागास जातींची लाेकसंख्या ठीकठाक आहे.


  जातीय समीकरण : येथे माय फॅक्टरचा परिणाम. मधेपुरात १३ % मुस्लिम व २२% यादव आहेत. सुपौलमध्ये १६% मुस्लिम आणि २१ % यादव मतदार आहेत. अररियाकमध्ये मुस्लिम निर्णायक ठरतील. येथे ३९ % मुस्लिम, १० % यादव आहेत.

Trending