आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरड्याचे दोरीने बांधले हात-पाय, काही तमाशा पाहत होते, तर काही बेदम मारहाण करत होते, मग अल्पवयीनाची काढली विवस्त्र धिंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाली, बिहार - जिल्ह्याच्या पहाडपूर तोई गावात दुकानात चोरी केल्याच्या आरोपावरून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या आरोपावरून एका बालकासोबत अमानुष व्यवहार करण्यात आला. येथे एका बालकाला दुकानात चोरी करताना काही जणांनी रंगेहाथ पकडले. या बालकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी लोक त्यालाच शिक्षा देऊ लागतात. त्या मुलाचे आधी दोरीने हात-पाय बांधले, मग मारहाण करण्यात आली. मग त्याच्या डोक्यावर दुकानातील गल्ल्याचा बॉकस ठेवून विवस्त्रावस्थेत त्याची गावातून धिंड काढण्यात आली. दरम्यान, हे सर्व घडत असताना काही जण फक्त तमाशा पाहत उभे होते, तर काही जण मजेने व्हिडिओ बनवत होते. जणू काय, मुलाला मारहाण नव्हे तर एखाद्या गारुड्याचा खेळच सुरू आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच सहदेई ओपी अध्यक्ष राजीव कुमार पोलिस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बालकाची झुंडीच्या तावडीतून सुटका केली आणि ठाण्यात नेले. स्थानिकांनी पोलिसांना सांगितले की, हा मुलगा नेहमीच आसपास छोट्यामोठ्या चोऱ्या करतो. अनेकदा त्याला समज देऊनही सोडण्यात आले, परंतु त्याच्यात सुधारणा झाली नाही. आता पुन्हा त्याला चोरी करताना पकडण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...