रात्री 2 वाजता / रात्री 2 वाजता दार ठोठावून मागितले पाणी, दार उघडताच बापाला बांधून त्याच्या डोळ‌यांदेखत केला मुलीवर गँगरेप

दिव्य मराठी वेब टीम

Feb 09,2019 12:01:00 AM IST

दिघलबँक (किशनगंज) - बापाला दोरखंडाने बांधून त्यांच्या डोळ्यांदेखत मुलीवर गावातीलच 6 नराधमांनी गँगरेप केल्याची घटना उजेडात आली आहे. ही घटना सोमवारी रात्री 2 वाजेनंतर घडली. पीडितेने बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल करून आपला जबाब नोंदवला आहे. यानंतर पोलिसांनीही सर्व आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू केली आहे.

असे आहे प्रकरण, बापाने सांगितला वेदनादायी प्रसंग
- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिघलबैंकच्या कोढ़ोवाड़ी परिसरातील एका गावाची आहे. पीडितेचे वडील म्हणाले की, गावातीलच 6 युवकांनी रात्री 2 वाजेनंतर घराचे दार ठोठावले. कोण आहे असे विचारल्यावर तहान लागल्याचे सांगून पिण्यासाठी पाणी मागितले.
- यानंतर दार उघडताच सर्व नराधम आत घुसले आणि वडील व त्यांच्या मुलीला बंधक बनवून रस्त्याच्या कडेपर्यंत नेले. तेथून बाइकवर बसवून तब्बल अर्धा किलोमीटर दूर एका जागेवर नेले. यानंतर सर्व युवकांनी माझ्यासमोरच मुलीवर दुष्कर्म केले.

जिवे मारण्याची दिली धमकी
- प्राप्त माहितीनुसार, गँगरेपनंतर नराधमांनी बाप-लेकीला घडलेली घटना कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर पीडितेने वडिलांच्या हातात बांधलेली दोरी उघडली आणि दोघेही घरी परतले.
- घरी आल्यावर पीडितेच्या वडिलांच्या तब्येत बिघडली तेव्हा कुटुंबाच्या लोकांनी आग्रह करून काळजीचे कारण विचारले. यावर बापाने ढसाढसा रडत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले.
- यानंतर बुधवारी स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. गँगरेपचा आरोप शेजारच्या फैज आलम (21 वर्षे), अब्दुल मन्नान (27 वर्षे), कालू (27 वर्षे), मो. कासिम (35 वर्षे), मो. तकसीर (24 वर्षे) और अन्सार (35 वर्षे) यांच्यावर आहे.
- एसपी कुमार आशिष यांनी घटनास्थळी पोहोचून पीडित कुटुंबीय व गावकऱ्यांकडून प्रकरणाची माहिती घेतली. दुसरीकडे 19 वर्षीय पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले.

X
COMMENT