आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 चा दहशतवादी कसाबला चक्क Domicile Certificate; अधिकारी निलंबित, अर्ज दाखल करण्याचीही चौकशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 26/11 मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबच्या नावे बिहारमध्ये चक्क जात आणि डोमेसाइल प्रमाणपत्र जारी करण्यात आला आहे. बिहारच्या औरया जिल्ह्यातील बिधूना तालुक्यात प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार उघडकीस आला. या प्रकरणात प्रमाणपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. सोबतच, प्रमाणपत्रासाठी ज्याने अर्ज दाखल केला होता त्याच्या चौकशीचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत घुसून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यापैकी जिवंत पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी कसाब होता. यानंतर त्याला देखील फासावर लटकवण्यात आले. तो पाकिस्तानी असल्याचे सर्वश्रूत आहे. परंतु, बिहारच्या तालुक्यात त्याच्या नावाने 21 ऑक्टोबर 2018 रोजी प्रमाणपत्र जारी केला. 


कसाबचा फोटो देखील लावला...
- कसाबच्या नावे काढण्यात आलेल्या या प्रमाणपत्रावर त्याचे संपूर्ण नाव आहे. त्यासाठी अर्ज करताना कसाबचा फोटो देखील अर्जासोबत जोडण्यात आला होता. तरीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात कशी आली नाही. त्यांना तो खरोखर येथील नागरिक आहे का याची शहनिशा करण्याची गरज सुद्धा भासली नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रमाणपत्रावर आईचे नाव वगळता संपूर्ण माहिती दहशतवादी कसाबचीच आहे. 
- मुंबईत 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेला कसाब एकमेव दहशतवादी होता. तत्पूर्वी 10 दहशतवाद्यांनी मुंबईत 166 जणांचा नरसंहार केला तसेच 600 हून अधिक नागरिकांना जखमी केले. कसाबला 26 नोव्हेंबर 2012 रोजी सुळावर लटकवण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...