आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा - एखाद्या कपलने हॉटेल किंवा लॉजवर थांबणे काही गुन्हा नाही. परंतु, यासाठी आपल्याला दोघांचेही वैध ओळखपत्र, वयाचा दाखला नाव नंबर आणि इतर माहिती नोंदवणे आवश्यक आहे. परंतु, काही हॉटेल आणि लॉज संचालक अशा कपल्सना घाबरवून त्यांच्याकडून जास्तीचे पैसे गोळा करतात. त्यांच्याठी हे कपल एक्सट्रा कमाईचे साधन बनले आहेत. ज्यादा पैसे दिल्यास असे हॉटेल जोडप्यांना ओळखपत्र किंवा काहीच पुरावे मागितले जात नाहीत. अल्पवयीन मुला-मुलींना सुद्धा सहज रूम उपलब्ध करून दिल्या जातात. अशाच हॉटेलांचा भांडाफोड बिहारच्या देवरिया रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आला आहे.
29 तरुणींसह 27 तरुण ताब्यात
देवरिया रेल्वे स्टेशनला लागून असलेले लॉज आणि हॉटेल जोडप्यांच्या भेटीचे अवैध ठिकाण बनले होते. येथील लॉजमध्ये शाळेतील मुले-मुली चक्क गणवेशात येत होते. पोलिसांत तक्रार देऊनही काहीच कारवाई होत नसल्याने स्थानिकांनी सुद्धा यावर दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. परंतु, पोलिस अधीक्षक श्रीपती मिश्र यांनी आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत एक पथक नेमले आणि मंगळवारीच आस-पासच्या तीन सर्वात कुप्रसिद्ध हॉटेलांवर छापे टाकले. पोलिसांनी सुरुवातीला लॉज आणि हॉटेलमधून बाहेर येणारे सर्वच रस्ते बंद केले. त्यानंतर आत जाऊन एक-एक करत 50 हून अधिक जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये 29 महिला, 27 पुरुष आणि हॉटेलच्या स्टाफचा समावेश आहे.
महागात पडली लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी प्रियकाची शेवटची भेट
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कुठल्याही महिला किंवा पुरुषाचे नाव सार्वजनिक केले नाही. त्या सर्वांची नावे आणि पत्ता गुप्त ठेवण्यात आला आहे. अचानक पोलिसांना पाहून सगळेच प्रचंड घाबरले होते. आपल्या नातेवाइकांना कळाल्यास खूप बदनामी होईल, कृपया सोडून द्या अशा विनवण्या ते करत होते. त्यातच एक तरुणी अशीही सापडली जिचा विवाह दोन दिवसांवर होता. ऐन लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला भेटण्याचे आश्वासन दिले होते. ती पोलिसांना हात जोडून सोडून देण्याची विनंती करत होती. कुणालाही कळल्यास कुटुंबियांना तोंड दाखवू शकणार नाही असे ती म्हणत होती. परंतु, पोलिसांनी कुणाचे काहीच ऐकून घेतले नाही.
एक महिला रोज यायची, पोलिसांना पाहताच काढला पळ...
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी काही अल्पवयीन किंवा शालेय विद्यार्थी देखील होते. त्या सर्वांच्या पालकांना फोन करून घटनास्थळी बोलावले आणि त्यांचे ताकीद देऊन पाल्यांना त्यांच्या हवाली केले. तर काही जोडपे विवाहबाह्य संबंधातूनही येथे पोहोचले होते. त्यापैकी एका महिलेने पोलिसांना पाहताच पोबारा केला. परंतु, पथकात असलेल्या महिला पोलिसांनी तिला दुसऱ्या दारातून पकडले. ही महिला रोज याच हॉटेलावर येत होती. तिची देखील चौकशी केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.