आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोतिहारी - बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात एका प्राध्यापकाला वाजपेयींवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. फेसबूक पोस्टवरूनच जमावाने त्यांना भर रसत्यावर ठार मारण्याचा प्रयत्न केला. प्राध्यापकांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना पाटणा येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पीडित प्राध्यापकांचे नाव संजय कुमार असून ते महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठात समाजशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.
चान्सलर विरोधात आवाज उचलल्याने लक्ष्य केल्याचा आरोप
संजय मोतिहारीच्या आझाद नगर भागात राहतात. त्यांच्या घरावर शनिवारी संध्याकाळी अचानक संतप्त जमाव घुसला आणि त्यांना घराबाहेर काढून बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्नही केला. संजय कुमार यांनी या कृत्यासाठी चान्सलर आणि त्यांच्या समर्थकांना जबाबदार धरले आहे. चान्सलर विरोधी आंदोलनात सहभागी झाल्याने काही लोक मुद्दाम आपल्याला टार्गेट करत आहेत. आपण फेसबूकवर अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर कसलीही आक्षेपार्ह पोस्ट केली नाही. तरीही चान्सलरच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नुकतेच झालेल्या चान्सलर विरोधी आंदोलनात मुख्य भूमिका घेतली होती. तेव्हापासूनच आपल्याला धमक्या मिळत आहेत असेही ते पुढे म्हणाले.
फेसबूवर नेमके काय लिहिले?
प्राध्यापक संजय यांनी फेसबूकवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर पोस्ट लिहिल्या होत्या. त्यापैकी एकामध्ये त्यांनी लिहिले, "अटल नेहरूवादी नसून संघी होते." यापूर्वी दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "भारतीय फासीवादच्या एका युगाचा अंत झाला. अटल जी अंतिम यात्रेसाठी निघाले आहेत."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.