आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलजींविरोधात फेसबुक पोस्टमुळे प्राध्यापकावर हल्ला, जमावाने केला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोतिहारी - बिहारच्या मोतिहारीमधील एका प्राध्यापकाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर फेसबुक पोस्ट करणे महागात पडले. यानंतर शनिवारी कथित पोस्टमुळे जमावाने घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. सूत्रांनुसार, प्राध्यापकावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून चांगल्या उपचारांसाठी त्यांना पाटण्याला रेफर करण्यात आले.

 

असे आहे प्रकरण

- पीडित संजय कुमार मोतिहारीच्या महात्मा गांधी सेंट्रल युनिव्हर्सिटीत समाजशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते, कुलगुरूंविरुद्ध बोलल्यामुळे काही जण त्यांना टारगेट करत आहेत.
- त्यांचे म्हणणे आहे की, फेसबुकवर त्यांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या शब्दांचा वापर केला नव्हता. प्राध्यापक संजयने हल्लेखोरांना कुलगुरूंचे चमचे असल्याचे सांगितले.
- ते म्हणाले, माजी कुलगुरूविरुद्ध झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर काही जण त्यांना सातत्याने धमक्या देत होते. शनिवारी फेसबुक पोस्टचा बहाणा करून लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.

 

काय होती ती फेसबुक पोस्ट?
- वास्तविक, प्राध्यापक संजय यांनी आपल्या टाइमलाइनवर अटलजींच्या निधनावर फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्यांनी लिहिले आहे- अटल नेहरूवादी नाही तर संघी होते. 
- यापूर्वीची एक पोस्ट आहे, जी त्यांनी स्वत: लिहिलेली आहे. यानुसार, 'भारतीय फासीवाद का एक युग समाप्त हुआ। अटल जी अंतिम यात्रा पर निकल चुके।'

 

घरी होते, तेव्हा झाला हल्ला
- संजय मोतिहारीच्या आझाद नगरचे रहिवासी आहेत. ते म्हणाले, शनिवारी जेव्हा मी माझ्या घरी होतो, तेव्हा काही जणांनी माझ्यावर हल्ला केला.
- हल्लेखोरांनी माजी पीएम अटलजींविरुद्ध अभद्र शब्दांचा वापर करत म्हटले की, माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा Video व आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...