आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar's Shivangi Will Be The First Woman Pilot In The Navy, Training Started In Kochi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारची शिवांगी नौदलातील देशाची पहिली महिला पायलट होणार, कोचीत घेणार प्रशिक्षण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरपूर : हवाई दलानंतर आता नौदलास देशाची पहिली महिला पायलट मिळणार आहे. बिहारच्या शिवांगी स्वरूपला हा मान मिळालेला आहे. ती काेचीत प्रशिक्षण घेत आहे. तिला ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त होणाऱ्या समारंभात तिला पदक लावण्यात येईल. शिवांगी नौदल कोची येथे ऑपरेशन विभागात रुजू होत आहे. ती फिस्क्सड विंग डॉर्नियर सर्व्हिलान्स विमान चालवेल. हे विमान कमी अंतरावरील सामुद्री मोहिमेवर पाठवले जाते. यात अॅडव्हान्स सर्व्हिलान्स, रडार, नेटवर्किंग व इलेक्ट्रॉनिक सेन्सर बसवलेले असतात. शिवांगीला गेल्या वर्षी जून महिन्यात व्हाइस अॅडमिरल ए. के. चावला यांनी अधिकृतपणे नौदलात सहभागी केले होते.

याही पहिल्या... भावना कांत : भारतीय हवाई दलाची पहिली महिली पायलट


कराबी गाेगाई : नौदलातील महिला डिफेन्स अटॅची. असिस्टंट लेफ्टनंट कमांडर गोगोई यांना पुढील महिन्यात रशियात तैनात करण्यात येईल. कर्नाटकातील कारवार बेसवर रशियन भाषेत अभ्यास करते आहे. त्या युद्धनौकेची निर्मिती व दुरुस्ती करण्यात निष्णात समजली जातेे.
नाैदलात सब लेफ्टनंट म्हणून झाली होती निवड
 

बातम्या आणखी आहेत...