Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | bike accident in Solapur

दुचाकींची समोरासमोर अपघात..

प्रितिनीधी | Update - Dec 07, 2018, 09:22 AM IST

तरुणाचा मृत्यू तर एक जखमी

  • bike accident in Solapur


    सोलापूर-देगाव नाक्याहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन दुचाकींची देगाव पुलावर समोरासमोर धडक झाली. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार जखमी झाला. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडे सात वाजता घडली. महेश वाघमोडे असे मृताचे नाव आहे.


    महेश दत्तात्रय वाघमोडे (वय २०, रा. देगाव) हा देगाव ते समृद्धी हॉटेलकडे मोटारसायकलच्या मागे बसून जात होता. पुलावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. महेश खाली पडला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यास सिव्हिलमध्ये दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीच्या मागे बसून येत असलेल्या भैरु नवनाथ शिंदे (वय २४, रा. उळेगाव उत्तर तालुका) हा जखमी झाला. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Trending