आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतका भीषण अपघात की बाइकचे झाले दोन तुकडे, मोबाईलमध्ये टिपला Shocking Accident

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा धक्कादायक अपघात मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपला आहे. पाकिस्तानात कैद झालेल्या या क्लिपमध्ये दोन ते तीन बाइकची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की एका बाइकचे दोन तुकडे झाले. यातील एका बाइकवर ट्रिपल सीट होते. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यास तेथे बाइक रेस सुरू असल्याचे दिसून येते. लोक रस्त्याच्या कडेला थांबून रेसिंगचा थरार मोबाईलमध्ये शूट करत होते. त्याच मोबाईलमध्ये हा धक्कादायक क्षण टिपला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानचा असला तरीही नेमका कोणत्या शहराचा हे अद्याप स्पष्ट नाही. 

बातम्या आणखी आहेत...