Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Bike Parts Buyer are arested in Jalna

जालन्यात कंपनीचे स्टिकर लावून दुचाकीचे पार्ट विकणारा ताब्यात

प्रतिनिधी | Update - Dec 09, 2018, 07:42 AM IST

शहरातील दर्गावेस परिसरातील खोलीत आढळले स्पेअर पार्ट

  • Bike Parts Buyer are arested in Jalna

    जालना- परराज्यातून दुचाकींचे पार्ट विविध कंपन्यांचे स्टिकर लावून जालन्यात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकास एडीएसने ताब्यात घेतले. ८ लाख ८७ हजार १९३ रुपयांचे स्पेअर पार्ट पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. जितेंद्रसिंग अशोक सचदेवा (आवास विकास कॉलनी, आगरा, उत्तर प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे.

    शहरातील दर्गावेस परिसरात भाडे तत्त्वावर खोली घेऊन एक जण दुचाकीचे सुटे पार्ट विक्री करण्यासाठी ग्राहकाची शोधाशोध करत असल्याची माहिती एडीएसचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना शनिवारी खबऱ्यामार्फत मिळाली होती. यानुसार पोलिसांनी कर्मचाऱ्यांना पार्ट विक्री करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी लोधी मोहल्ला या ठिकाणी पाठवले. या वेळी जितेंद्रसिंग अशोक सचदेवा ह्याला ताब्यात घेत त्याच्याजवळ विविध कंपन्यांच्या दुचाकीचे ८ लाख ८७ हजार १९३ रुपये किमतीचे सुटे पार्ट आढळून आले. या पार्टबाबतची खरी कागदपत्रे आढळून आली नाहीत. हे पार्ट बनावट तयार केलेले असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी जप्त केले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक एस.चैतन्या, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, पोलिस हेडकॉन्स्टेबल ज्ञानदेव नागरे, एम.बी.स्कॉट, नंदू खंदारे, किरण चव्हाण, नंदकिशोर कामे, आकाश कुरील, गजू भोसले यांनी केली.

    पार्ट नेमके आले कोठून?
    विविध कंपन्यांचे हे स्पेअर पार्ट असून त्याला स्टिकर लावून ते विक्री करण्याचा प्रयत्न या व्यक्तीचा होता. त्याच्याकडे विविध कंपन्यांचे स्टिकरही आढळले. मात्र, हे पार्ट नेमके आले कोठून याचा शोध पोलिस घेत आहेत.

Trending