आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यापाठोपाठ कोर्ट परिसरातूनही दुचाकी लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोलिस ठाण्याच्या आवारातून कर्मचाऱ्याचीच दुचाकी चोरून नेल्याची घटना ताजी असताना न्यायालय परिसरातील पार्किंगमधील दुचाकीवर हात मारून चोरट्यांनी कळस चढवला आहे. या सोबतच घुईखेड येथूनही चोरट्यांनी एक दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी १० डिसेंबर रोजी भरदिवसा नागपूरी गेट पोलिस ठाण्यातून खुद्द वारीस अंबादास तायडे या पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास केली. पोलिसाचीच दुचाकी तेही ठाण्यातून लंपास करण्यात आल्याने पोलिस प्रशासनातही खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिस ठाण्यातच कर्मचाऱ्याची दुचाकी सुरक्षित राहू शकत नसल्यामुळे भररस्त्यावरील दुचाकींचे काय असा गंभीर प्रश्न जनसामान्यांच्या मनात उपस्थित झाला होता. दरम्यान याप्रकरणी चोरट्यांना जरी अटक करण्यात आली असली तरी शहरासह जिल्ह्यातील दुचाक्या चोरींच्या घटनांना आळा मात्र बसू शकला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान पोलिस ठाण्यातील दुचाकीवर हात मारल्यानंतर चोरट्यांनी न्यायालय परिसरातून दुचाकी चोरून नेली. अंजनगाव बारी येथील प्रतिक विनोद तिखे हा युवक शनिवारी (दि. २२) दुपारी बारा वाजता येथील न्यायालयात आला होता. त्याने दुचाकी (एमएच ३० एस ०२८२) न्यायालय परिसरातील पे अॅन्ड पार्क मध्ये ठेवली. काम आटोपून परत जाण्यासाठी तो दुचाकीजवळ गेला असता दुचाकी आढळून आली नाही. प्रतिकने रविवारी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसरी दुचाकी चोरीची घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याअंतर्गंत येत असलेल्या घुईखेड येथे उघडकीस आली. बुधवारी आठवडी बाजार असल्यामुळे प्रफुल्ल मुरलीधर येवले बाजारात दुचाकीने (एमएच २७ एएल ६२१९) गेला होता. यावेळी प्रफुल्लने दुचाकी घुईखेड चौकाच्या बाजूला उभी केली होती. बाजार करून दुचाकीजवळ परत आल्यानंतर त्याला दुचाकी आढळून आली नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...