Home | Business | Auto | bike that runs on vodka waste product sets a new speed record

पेट्रोल नव्हे Vodka वर सुसाट धावली ही Bike, ताशी 181 किमी वेगावर पोहोचून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 12:19 AM IST

बाइक हातांनी बनवण्यात आली. त्यास माँटाना येथील मोंटगोमॅरी डिस्टिलरीचे मालक रियान यांनी Bonneville मध्ये चालवले आहे.

 • bike that runs on vodka waste product sets a new speed record

  ऑटो डेस्क - Vodka वेस्ट प्रोडक्ट्सवर धावणाऱ्या एका मोटरसायकलने Bonneville Salt Flats स्पीड ट्रायल्समध्ये जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. बी बाइक एक मॉडिफाइड 1980 यामाहा XS650 आहे, जी रीसाइल्ड व्होडकावर पळवण्यात आली आहे. ही बाइक हातांनी बनवण्यात आली असून त्यास माँटाना येथील मोंटगोमॅरी डिस्टिलरीचे मालक रियान मोंटगोमॅरीने Bonneville मध्ये चालवले आहे. गेल्या हिवाळ्यात रियान यांनी बाइकचा आराखडा तयार केला होता. तसेच लँड स्पीड रेसिंगमध्ये सहभागी होण्याचा सुद्धा निर्णय घेतला. या बाइकला 'Sudden Wisdom' नाव देण्यात आले आहे. मोटरसायकलने ताशी सरासरी 98 mph (157.71 kmph) स्पीडचे लक्ष्य पूर्ण केले आहे.


  व्होडकाने बनवले इंधन
  विशेष म्हणजे, या मोटरसायकलच्या फ्लूल टँकमध्ये थेट व्होडका ओतण्यात आलेला नाही. तर व्होडकावर डिस्टिलरिंग प्रक्रिचा करून त्याचे पुनरवापर करण्यात आले आहे. अशा प्रकारचा व्होडका एक स्वच्छ आणि पूर्णपणे ज्वलनशील इथेनॉल आहे. डिस्टिलरेशन प्रोसेसनंतर उरणाऱ्या केर-कचऱ्याचा वापर केला जात नाही. तो फेकून दिला जातो. त्याचाच वापर बाइकमध्ये करण्यात आला आहे.


  मित्राच्या मदतीने बनवले असे इंधन
  41 वर्षीय रियान यांनी व्होडकावर बाइक चालवली, तरीही त्यांनी व्होडकाचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने यासाठी नेमका कसा केला याचा खुलासा केला नाही. तरीही त्यांनी अशा स्वरुपाचे इंधन आपल्या मित्राच्या मदतीने घरातील गॅरेजमध्ये तयार केल्याचे म्हटले आहे. आपल्याला अशा प्रकारचे फ्यूल तयार करण्यासाठी आणि बाइकला त्यासाठी तयार करण्याकरिता अनेक महिने लागले असे रियान यांनी सांगितले आहे.

  किती आला खर्च?
  हा प्रोजेक्ट स्पॉन्सर करण्यात आला होता. यासाठी 1000 अमेरिकन डॉलर (जवळपास 70 हजार रुपये) मिळाले होते. तसेच बाइकच्या मॉडिफिकेशनसाठी त्यांना अतिरिक्त 5000 डॉलर (3.5 लाख रुपये) लागले आहेत. रेस टीमने पर्यायी फ्लूलसोबत 1980 ची 750 सीसी इंजिन असलेली यामाहा बाइक निवडली. हा नवीन विक्रम करण्याच्या तीन दिवसांनंतर टीमने आता 1974 च्या HONDA CB750 बाइकवरून 143 mph (230 kmph) स्पीड मिळवली आहे.

Trending