आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pune Crime: नंबर प्लेट बदलून बनावट कागदपत्रांच्या आधारे करायचे बाइक विक्री, दोघांच्या अटकेनंतर झाला 45 बाइक चोरल्याचा खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे पोलिसांनी बाइक चोरी प्रकरणाच्या मोठ्या रॅकेटचा मंगळवारी भांडाफोड केला आहे. पुणे पोलिसांना दोन युवक बनावट कागदपत्रे तयार करून बाइक विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या दोघांनाही वेळीच अटक करण्यात आली. कसून चौकशी केली असताना त्यांनी आपण बाइक चोरणाऱ्या रॅकेटचा सदस्य असल्याची कबुली दिली. या दोघांच्या गँगचे जाळे इतर शहरांमध्ये सुद्धा पसरले आहे. तसेच आतापर्यंत त्यांनी 45 बाइक चोरी केल्याचे मान्य केले. बाइक चोरून त्याच्या नंबर प्लेट बदलणे आणि बनावट कागदपत्रे तयार करून त्यांची विक्री करणे, हा त्यांचा उद्योग होता.


पुणे, लातूर, सोलापूर आणि परभणीपर्यंत पसरले होते रॅकेट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाइक चोरांचे रॅकेट पुणे, लातूर, सोलापुर आणि परभणीपर्यंत पसरले होते. त्यांच्याकडून 27 बाइक जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची बाजारातील किंमत सुमारे 27 लाख रुपयांच्या घरात आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांचीही सध्या कसून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये टोळीच्या इतर शहरातील सदस्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.