आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: सिडकोत दुचाकी चोरीसाठी फिरणारी 4 ते 5 जणांची टोळी सीसीटीव्हीत कैद 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको (नाशिक) - सिडको भागात दुचाकी चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला असून अनेक दुचाकी चोरीस गेल्या आहेत. रात्रीच्या वेळी चार ते पाच चोरटे दुचाकी चोरत असून यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. एका दुचाकी चोरीच्या घटनेत हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांपुढे तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. सिडको हा दाट लोकसंख्येचा भाग म्हणून ओळखला जातो. अनेक घरे एकमेकाला लागून दाटीवाटीने आहेत. येथे वाहन पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यामुळे प्रत्येक चालक हा जशी असेल किंवा जिथे जमेल तशी दुचाकी पार्किंग करीत असतो. त्यामुळे चोरट्यांचा चोरीसाठी आयतीच वाहने मिळतात. राहुल घुमरे याची स्प्लेंडर (एमएच १५ - सीएल ६५०२) ही महादेव मंदिर, शिवपुरी चौक व विशाल कोलते यांची अॅक्टिव्हा (एमएच १५ एफएल ७१९९) ही भोळे मंगल कार्यालयाजवळ, कामटवाडे येथून चोरीला गेली आहे. यापूर्वी अनेक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत अंबड पोलिस अधिक तपास करीत आहेत. या चोरट्यांचा पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याच चोरट्यांचा हा चोरीचा प्रकार एका सीसीटीव्हीत कैद झाला असून हे चोरटे लवकर सापडतील, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

 

गॅरेज व्यावसायिकांची तपासणी गरजेची
चोरीच्या दुचाकी चोरल्यावर त्यातील अनेक पार्ट काढून घेतले जातात. महागडे पार्ट गॅरेज व्यावसायिकांना विकले जातात आणि यातूनच चोरट्यांचे फावते. यामुळे या गॅरेज व्यावसायिकांची तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...