आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल गेट्स व वॉरेन बफेट यांनी हाॅटेलमध्ये केले काम; वेटर बनले, खाद्यपदार्थ वाढले, कॅश काउंटरही सांभाळले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओमाहा - जगातील दाेन सर्वात श्रीमंत व्यक्ती  बिल गेट्स व वॉरेन बफेट हे एखाद्या हाॅटेलमध्ये काम करताना दिसल्यास त्यावर विश्वास ठेवणे कदाचित कठीण जाईल; परंतु असे घडले अाहे. अमेरिकेत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (६३) व बर्कशायर हॅथवेचे चेअरमन वॉरेन बफेट (८८) यांनी आइसक्रीम व फास्टफूड रेस्टाॅरंट डेरी क्वीनमध्ये चक्क सामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे काम केले. दोघांनी वेटर बनून ग्राहकांना खाद्यपदार्थही वाढले. तसेच कॅश काउंटरही सांभाळले. बिल यांनी मंगळवारी याचा व्हिडिअो शेअर केला. त्यात हे दोन्ही अब्जाधीश काम करताना दिसत अाहेत. गेट्स व बफेट यांनी अॅप्रन घालून मिल्कशेक बनवला. ग्राहकांना सेवा देताना दाेघेही मस्करी करतानाही त्यात दिसताहेत.

 

काही वेगळे करायचे असल्याने वार्षिक बैठकीतून वेळ काढून घेतले प्रशिक्षण 
गत महिन्यात समभागधारकांच्या वार्षिक बैठकीतून वेळ काढत बफेट व गेट्स यांनी काही तरी वेगळे करण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. त्यानुसार दोघांनी डेरी क्वीन हाॅटेलमध्ये कामाचे प्रशिक्षण घेतले. बफेट हे डेरी क्वीन रेस्टोरंट चेनचे मालक आहेत. त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवेने ती १९९८ मध्ये खरेदी केली हाेती.

 

गेट्स हे जगात दुसरे, तर वॉरेन बफेट चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती 
बिल गेट्स हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून, त्यांची एकूण संपत्ती ७.१४ लाख काेटी, तर वॉरेन बफेट हे यात चौथ्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती ५.८४ लाख काेटी रुपये अाहे. बफेट, बिल व मिलिंडा गेट्स यांनी ‘गिव्हिंग प्लेज’ माेहीम सुरू केली हाेती. यातून त्यांनी जगातील श्रीमंतांना दानाचे आवाहन केले हाेते.

बातम्या आणखी आहेत...