आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीश व्यापाऱ्याचे शाळेचे राजमहाल करण्याचे स्वप्न केले पूर्ण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माॅस्काे - रशियातील अब्जाधीश आंद्रेई सिमानोव्हस्की यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याचा कायापालट केला आहे. त्यांनी शाळेला राजमहालात परिवर्तित केले आहे. आंद्रेई येकातेरिनबर्ग १०६ माध्यमिक शाळेचे माजी विद्यार्थी असून व्यापारी आहेत. मार्बल व सोन्याच्या भिंती, फरशी व बाथरूममध्ये अॅडव्हान्स बेसिन बसवले आहेत. शाळेच्या छतावर लागलेले सोन्याचे झुंबर पाहून आपण एखाद्या शाळेत नव्हे तर फ्रान्समधील एका आलिशान राजमहालात आलो असल्याचा भास होतो. आंद्रेई यांची लहानपणापासूच श्रीमंत होण्याची इच्छा होती. पुरेसा पैसा जमा झाला तर आपल्या शाळेचे रूपांतर एका राजमहालासारखे करू, अशी त्यांची इच्छा होती. ते त्यांनी साकारले. शाळेच्या बहुतांश भागाचे काम पूर्ण झाले आहे. वर्गखोल्या व कार्यालय आणखी सजवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यास  इमारतीबरोबरच खेळाचे मैदान व जिमचेही नूतनीकरण करण्याची आंद्रेई यांची इच्छा आहे. बातम्या आणखी आहेत...