आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमधील उमेदवार कोट्यधीश; चव्हाण कुटुंब ४६ कोटींचे धनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची अविभक्त हिंदू कुटुंबाची एकत्रित संपत्ती ४६ कोटी ११ लाख ८५ हजार ४०३ रुपये एवढी आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर ४ कोटी ३ लाख ९५ हजार ६८७ रुपये कर्जही आहे. निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रातून चव्हाणांनीच ही माहिती दिली.

वैयक्तिक अशोक चव्हाणांची मालमत्ता २१ कोटी ४७ लाख ३१ हजार ७५२ रुपये एवढी आहे. तर पत्नी अमिता चव्हाण यांच्याकडे १२ कोटी ८७ लाख ७ हजार ६९० रुपये एवढी संपत्ती आहे. अशोक चव्हाणांकडे रोख स्वरूपात ७ लाख २२ हजार ३२५ रुपये रक्कम असून अमिता चव्हाण यांच्याकडे २ लाख ५२ हजार ८११ रुपये रोख स्वरूपात रक्कम आहे. चव्हाणांवर वैयक्तिक स्वरूपात २ कोटी ८३ लाख रुपयाचे कर्ज आहे. तर अमिता चव्हाण यांच्यावरही १ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज आहे. अशोक चव्हाणांकडे शेती, फ्लॅट, प्लाॅट स्वरूपात २३ कोटी ५५ लाख ६३ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अमिता चव्हाण यांच्याकडेही १४ कोटी ६९ लाख ३७ हजार ३११ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. चव्हाणांकडे सोने, चांदी, हिरे असून त्याचे मूल्य ५७ लाख ६८ हजार ३०४ रुपये आहे. तर अमिता चव्हाणांकडेही १ कोटी ६५ लाख २४ हजार ९३८ रुपयांचे दागदागिने आहेत. मुंबई, औरंगाबाद, पैठण, नांदेड आदि शहरात त्यांची स्थावर मालमत्ता असून तेथील बँकांतही त्यांचे पैसे असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अशोक चव्हाण जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचे या प्रतिज्ञापत्रावरून मानले जाते.
अशोक चव्हाण
वैयक्तिक मालमत्ता
२१ कोटी ४७ लाख ३१ हजार ७५२ रुपये एवढी आहे.

डी.पी.सावंत यांची मालमत्ता ४.८४ कोटी
नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या दोन मतदार संघातील काँग्रेस व शिवसेना उमेदवार कोट्यधीश आहेत. डी.पी. सावंत यांची अविभक्त हिंदू कुटुंबातील संपत्ती तब्बल ४ कोटी ८४ लाख २३ हजार ६६१ रुपये एवढी आहे तर राजश्री पाटील यांची एकत्रित संपत्ती १ कोटी ९७ लाख १७ हजार ९९२ रुपये एवढी आहे. डी.पी.सावंत यांच्याकडे रोख रक्कम ७५ हजार तर त्यांच्या पत्नी रंजना सावंत यांच्याकडे ५० हजार रुपये आहेत. सावंत यांच्या ५३ लाख ५८ हजार ६४५ रुपयाच्या बँकांत ठेवी आहेत. तर पत्नीच्या नावे बँकांत ६ लाख ९२ हजार ६७८ रुपयाच्या ठेवी आहेत. २ लाख २२ हजार १०० रुपयाची त्यांची शेअर व इतरत्र गुंतवणूक आहे. त्यांच्या पत्नीची १० हजार २५० रुपयाची गुंतवणूक आहे. सावंत यांना विमा पॉलिसीतून ७ लाख ५८ हजार १५१ रुपयाचा लाभ होणार आहे तर पत्नीला ३ लाख ६८ हजार ९३ हजार रुपये विम्यापोटी मिळणार आहेत. सावंत यांच्याकडे २ लाख ७१ हजार ९५० रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. तर पत्नीकडे ११ लाख २१ हजार ७०० रुपयाचे दागिने आहेत. सावंत व त्यांच्या पत्नीकडे एकत्रित १ कोटी ४५ हजार ७०३ रुपयाची चल संपत्ती आहे. याशिवाय सावंत यांच्याकडे वारसा हक्काने २ लाख २२ हजार ९५८ रुपयांची कोकणात वारसा हक्काने आलेली स्थावर मालमत्ता आहे. सावंतांवर तीन लाखांचे कर्जही आहे.
डी.पी. सावंत
कुटुंबातील संपत्ती
४ कोटी ८४ लाख २३ हजार ६६१ रुपये एवढी आहे.

राजश्री पाटीलही आहेत कोट्यधीश
नांदेड दक्षिणमधून निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेच्या राजश्री पाटीलही कोट्यधीश आहे. राजश्री पाटील यांच्याकडे लाख रुपये रोख रक्कम तर त्यांचे पती खा. हेमंत पाटील यांच्याकडे ३ लाख रोख रक्कम आहे. राजश्री पाटलांच्या २ लाख ९४ हजार २९४ रुपयाच्या बँकेत ठेवी तर तर हेमंत पाटलांच्या ११ लाख ७२ हजार ५४८ रुपयाच्या बँकेत ठेवी आहेत. मुलगा रुद्रच्या नावानेही ३५ हजार ७९१ रुपयांच्या ठेवी आहेत. विम्यापोटी ९९ हजार १८५ रुपयाचा लाभ होणार आहे. राजश्री पाटील यांची शेअर व इतर गुंतवणुकीद्वारे १३ लाख ९ हजार ३०० रुपयाची गुंतवणूक आहेत तर हेमंत पाटलांची १ लाख ४५ हजार ५३४ रुपयाची गुंतवणूक आहे. राजश्री पाटलांकडे ३ लाख २० हजार रुपये किंमतीचे दागदागिने आहेत तर हेमंत पाटलांकडे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने आहेत. राजश्री पाटील यांच्या चल संपत्तीचे एकूण मुल्य ६४ लाख ८६ हजार २७३ रुपये एवढे आहे. याशिवाय हेमंत पाटील यांच्या नावे २० लाख रुपये किमतीचे भूखंड आहेत तर मुलगा रुद्र याच्या नावे ६ लाख ५१ हजार रुपये किंमतीचे भूखंड आहेत. राजश्री पाटील यांच्यावर २४ रुपये तर हेमंत पाटील यांच्यावर ८ लाख ९२ हजार रुपये कर्ज आहे. पाटील दांपत्याकडे एकूण १ कोटी ९७ लाख १७ हजार ९९२ रुपये एवढे आहे.
राजश्री पाटील
एकत्रित संपत्ती
१ कोटी ९७ लाख १७ हजार ९९२ रुपये एवढी आहे.