आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालावर इन्सायडर ट्रेडिंगचे आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारताचे वॉरेन बफे संबोधले जाणारे अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या कथित इन्सायडर ट्रेडिंग प्रकरणात अडचणी वाढताना दिसत आहेत. बाजार भांडवल नियामक सेबीने मंगळवारी त्यांना समन्स पाठवले आहे. सेबी अॅपटेक लिमिटेडच्या समभागांशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहे. ही एज्युकेशन कंपनी झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबाची आहे. सेबीच्या चौकशीच्या कक्षेत अॅपटेकचे काही संचालक मंडळ सदस्यही आहेत.  यामध्ये गुंतवणूकदार रमेश एस. दमाणी आणि कंपनीमधील संचालक मधू जयाकुमारसह काही मंडळ सदस्याच्या भूमिकेचीही चौकशी होत आहे. अहवालानुसार, सेबी, झुनझुनवाला कुटुंबातील अॅपटेकचे समभागधारक असणाऱ्या अन्य सदस्यांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहे. याअंतर्गत सेबीने झुनझुनवाला यांच्याशिवाय त्यांची पत्नी रेखा, भाऊ राजेश कुमार, सासू सुशीला देवी गुप्तालाही सेबीने २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावले होते. मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सेबीच्या मुख्यालयात झुनझुनवाला यांची सुमारे दोन तास चौकशी केली होती. झुनझुनवाला वकिलासमवेत सेबीच्या कार्यालयात आले होते. त्यांची दोन तास चौकशी झाली. झुनझुनवाला यांनी कुटुंबातील सदस्यांच्या वतीनेही तेच बोलतील,असे सांगितले.

अॅपटेकचे ४९% समभाग 
समभाग गुंतवणुकीतून नफा कमावण्याच्या कौशल्यामुळे झुनझुनवाला भारताचे वॉरेन बफे मानले जातात. ते देशातील सर्वात वैयक्तिक गुंतवणूकदार आहेत. फोर्ब्जनुसार जानेवारी २०२० पर्यंत गेल्या एका दशकात झुनझुनवालांची संपत्ती दुप्पट होऊन २६० कोटी डॉलर(१८,४६० कोटी रु.) झाली. त्यांनी अॅपटेकमध्ये प्रथम २००५ मध्ये ५६ रुपये मूल्यावर समभाग खरेदी केले होते. ते व कुटुंब सदस्यांकडे आता अॅपटेकची ४९% हिस्सेदारी आहे. सोमवारी बीएसईवर अॅपटेकच्या समभागाची क्लोजिंग प्राइस(१७३ रु.)च्या हिशेबाने त्यांच्या कुटुंबाच्या समभागांचे मूल्य ६९० कोटी रुपये आहे. 

इन्सायडर ट्रेडिंग काय असते 
कंपनी व्यवस्थापनातील लोकांकडे कंपनीशी संबंधित खूप महत्त्वाची माहिती असते. ते अशी कोणती माहिती सार्वजनिक होण्याआधी या माहितीच्या आधारे कंपनीच्या समभागांत खरेदी-विक्री करून वा संबंधित एखादे पाऊल उचलून फायदा उठवत असेल तर त्यास इन्सायडर ट्रेडिंग म्हटले जाते. सेबी कायदा १९९२ अंतर्गत इन्सायडर ट्रेडिंग गुन्हा आहे.