आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीश युसूफ अलींनी पोलिस यार्डाचे केले फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रूपांतर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एडिनबर्ग  - भारतीय अब्जाधीश युसूफ अली कादेर यांनी  स्कॉटलंडच्या लंडन पोलिस यार्डाचे नूतनीकरण केले असून या  इमारतीत  आता  पंचतारांिकत हॉटेल या वर्षअखेरीस सुरू होत आहे. युसूफ यांनी “ग्रेट स्कॉटलंड यार्ड’नावाची इमारत २०१५ मध्ये १ हजार कोटी रुपयांत विकत घेतली होती. येथे पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी ७५ मिलियन पाउंड (सुमारे ६८५ कोटी रु) खर्च करण्यात आले आहेत. या हॉटेलमध्ये १५३ खोल्या आहेत. येथे उतरण्यासाठी एका रात्रीचा किराया १० हजार पाउंड(९ लाख रुपये) इतका आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने या ऐतिहासिक इमारतीचा पट्टा   निधी जमवण्यासाठी विकला होता. याचे बांधकाम १८२९ मध्ये झाले. केरळचे युसूफ अली अबुधाबी  येथील लुलू समूहाचे प्रमुख आहेत.  

 

गुन्हेगारांना ठेवले जाई अशा यार्डात  
येथे गुन्हेगारांना ठेवण्यासाठी बांधलेल्या  खोल्या किरायाने घेता येतील. या हॉटेलमध्ये बार, चहा पार्लर, बालरूम व रेस्तराँ आहे. येथे पाहुण्यांना लंडनमधील कुख्यात गुन्हेगारांची माहिती देण्यात  येईल. पाहुण्यांना कैद्यांनी केलेल्या कलाकृतीही दाखवण्यात येतील.  
 

हॉटेलचे बदललेले रुप पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....

बातम्या आणखी आहेत...