Home | International | Pakistan | bin laden home raid in pakistan

लादेनच्या घराची झाडाझडती

agency | Update - May 29, 2011, 02:54 AM IST

इस्लामाबाद - सीआयएच्या एका न्यायवैद्यक पथकाने शनिवारी एबोटाबादेत कुख्यात आंतरराष्ट्रीय अतिरेकी ओसामा बीन लादेनच्या अतिरेकी कारवायांच्या ब्लूप्रिंटचा शोध घेण्यासाठी त्याच्या ठिकाणाची सखोल झाडाझडती घेतली.

 • bin laden home raid in pakistan

  इस्लामाबाद - सीआयएच्या एका न्यायवैद्यक पथकाने शनिवारी एबोटाबादेत कुख्यात आंतरराष्ट्रीय अतिरेकी ओसामा बीन लादेनच्या अतिरेकी कारवायांच्या ब्लूप्रिंटचा शोध घेण्यासाठी त्याच्या ठिकाणाची सखोल झाडाझडती घेतली.लादेन अनेक वर्षे लपून बसलेल्या तीन मजली हवेलीमध्ये तब्बल सहा तास कसून झडती घेण्यात आली.ही शोध मोहीम सुरू असताना कोणालाही या हवेलीच्या आसपास फिरकण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.मिडियालाही दूरच ठेवण्यात आले.

  'डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार,सीआयएचे हे पथक हेलिकॉप्टरने हवेलीपर्यंत पोहचले. पोलिस आणि अन्य सूत्रांनी या अमेरिकी पथकाकडून करण्यात आलेल्या शोध मोहिमेला दुजोरा दिला नाही. एक्सप्रेस ट्रीब्यूनलने म्हटले आहे की, लादेनचा खात्मा झाला त्या हवेलीची सीआयएच्या पाच सदस्यीय न्यायवैद्यक पथकाने झडती घेतली.

  भींती, फरश्यांची तपासणी
  या पथकाने काही अतिरिक्त माहितीसाठी बिलाल कस्ब्यातील कडेकोट बंदोबस्त असलेल्या एका परिसराचीही तपासणी केली. भींती आणि फरश्यांखाली काही गोपनीय माहिती लपवून ठेवलेली असू श्कते, अशी शंका असल्याने भींती आणि फरश्यांचीही बारकाईने तपासणी केली.

  कडेकोट बंदोबस्त
  तपासणीच्या वेळी अमेरिकी पथकाबरोबर पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे वरीष्ठ अधिकारीही होते. पथकाकडे अत्याधुनिक उपकरणे होती. सुरक्षेसाठी हवेलीपासून ६ फूट अंतरावर पोलिसांचे कडे करण्यात आले होते. वृत्तपत्रे आणि चॅनेलवाल्यांनाही ठराविक अंतरावरच ठेवण्यात आले होते. छायाचित्रे काढण्याचीही परवानगी नव्हती.

  लष्करी अधिका:यांची उडाली झोप
  ओसामा बीन लादेन राजधानीच्या अतिशय जवळ असल्याची माहिती मिळताच पाकिस्तानी लष्करी अधिका:यांची झोप उडाली होती.एवढेच नव्हे तर खुद्द लष्करप्रमुख अशफाक कियानीही हादरून गेले होते.इस्लामी अतिरेकी त्यांची पदेच ताब्यात घेतील,अशी भीती या अधिका:यांना वाटत होती. हा खळबळजनक गौप्यस्फोट वॉशिग्टंन पोस्टने एका वरिष्ठ पाकिस्तानी गुप्तचर अधिका:याचा हवाला देऊन केला आहे.

  एका अमेरिकी अधिका:याशी अत्यंत खाजगी स्वरूपाची चर्चा करताना लष्करप्रमुख जनरल कियानी म्हणाले की, पाकिस्तानमध्ये सातत्याने होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे आम्ही प्रचंड दबावाखाली आहोत. हल्लेखोरांना त्यांच्या निशाण्यावर असलेल्या ठिकाणांची अत्यंत गोपनीय माहितीही मिळू लागली आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अश्यास्थितीत आपले स्वत:चे घर ठिकठाक करणे हाच आमचा प्राधान्यक्रम आहे.

  अतिरेक्यांविरूध्दच्या संघर्षात पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संघटना दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप अमेरिका अन्य पाश्चात्य राष्ट्रे अनेक वर्षांपासून करीत आले आहेत.

Trending