आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शोषणाच्या बहाण्याने बिन्नींना हटवले ? - कर्मचाऱ्यांचा सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्टच्या ग्रुप सीईओ पदाचा राजीनामा दिला असला तरी हा  निर्णय त्यांनी ख्ूप आधीच वीच होता. सूत्रांनुसार, त्यांनी शनिवारी निवडक मित्रांना फोन करून याची माहिती दिली. नवे प्रवर्तक वॉलमार्ट लैंगिक शोषणाच्या अनेक वर्षे जुन्या प्रकरणाची खोलवर चौकशी करू इच्छिताज यावरून भारतातील सर्वात मोठी ई-काॅमर्स कंपनीचे संस्थापक हैराण होते. असे असले तरी चौकशीत बिन्नीविरुद्ध आरोप सिद्ध होऊ शकला नाही. मात्र, तरीही त्यांना १० वर्षांपूर्वी स्थापलेल्या या कंपनीचा राजीनामा देणे सोईचे वाटले. वॉलमार्टने याचा वापर करून बिन्नींना हटवले काय? असा सवाल फ्लिपकार्टच्या आ व बाहेरही केला जात आहे.  

 

तज्ञांचे मत : भारत सदैव बिन्नी बन्सल यांना हीरो म्हणून सादर करत राहील  

राजीनाम्यामुळे कर्मचाऱ्यांना आश्चर्य  
वॉलमार्टने बिन्नी यांच्या राजीनाम्याची घोषणा अमेरिकेतील मुख्यालयातून केली. फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त आश्चर्य राजीनाम्यामागच्या कारणाबाबत आहे. वॉलमार्टने केवळ एवढेच सांगितले की, बिन्नी बन्सल यांनी वैयक्तिक गैरवर्तनाच्या आरोपावरून राजीनामा दिला आहे. चौकशीत कोणताही अारोप सिद्ध झाला नाही. तरीही त्यांनी या प्रकरणी पारदर्शकता अवलंबिली नाही. त्यामुळे राजीनामा स्वीकारला जात आहे.  


कर्मचाऱ्यांना वॉलमार्टच्या नियतीवर संशय  
वॉलमार्टच्या स्वच्छता कार्यक्रमामुळे कुणीच समाधानी नसल्याचा साधारण दोन डझन लोकांशी केलेल्या चौकशीअंती निष्कर्ष निघाला आहे. कर्मचाऱ्यांना वॉलमार्टच्या नियतीवर संशय वाटू लागला आहे. फ्लिपकार्टचे अन्य वरिष्ठ अधिकारीही काढले जाऊ शकतात, असा त्यांना संशय आहे. अॅरिझोना स्टेट विद्यापीठाचे प्रा. कन्नन रामास्वामी म्हणाले, वॉलमार्टने ज्या पद्धतीने हे प्रकरण सोडवले ते पाहता उत्तर कमी व प्रश्न जास्त उपस्थित होतात. तुम्ही ही बाब मान्य करा किंवा नाही, बिन्नी बन्सल भारताचे सर्वांत यशस्वी उद्योगपतींपैकी एक आहेत. भारत कायम त्यांना आपला हीरो मानत राहील. त्यामुळे हा मुद्दा लवकर सुटेल, असे मला वाटत नाही.  


बिन्नी यांनी महिलेस पैसे दिले का?  
२०१६ मध्ये बिन्नी यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने वॉलमार्टच्या अधिकाऱ्यांकडे जुलै महिन्यात केला होता. बिन्नी व संबंधित महिलेत संबंध कसे प्रस्थापित झाले हे जागतिक लाॅ फर्मच्या तपासात उघड झाले आहे. ज्या वेळी घटना घडली तेव्हा महिला फ्लिपकार्टमध्ये नव्हती, त्याआधीच ितने कंपनी सोडली होती. असे असतानाही करारावेळी बिन्नी यांनी याची माहिती का दिली नाही, हे वाॅलमार्टचे अधिकारी जाणू इच्छित होते. महिलेला गप्प बसण्यासाठी बिन्नी यांनी पैसे दिले होते काय, हेही ते जाणू इच्छित होते.  


जुन्या संबंधाबाबत सांगणे बंधनकारक नााही  
बिन्नी यांच्यासाठी संबंध जाहीर करणे आवश्यक नव्हते. कारण, त्यांच्याविरुद्ध बळजबरी केल्याचा कोणताही पुरावा नव्हता. लॉ फर्मच्या चौकशीनंतर त्यांची जास्त चौकशी होईल, असे त्यांना वाटत नव्हते. विशेष म्हणजे फ्लिपकार्टमध्ये लैंगिक शोषण व व्हिसलब्लोअरच्या तक्रारींशी संबंधित धोरण बनवण्यात बिन्नी बन्सल यांचे मोठे योगदान आहे. एका अमेरिकी लाॅ फर्मचे अॅटर्नी अॅलेेन एक्सेलरॉड यांनी सांगितले की, जुने अारोप नव्या प्रवर्तकाला सांगणे बिन्नी यांच्यासाठी बंधनकारक अाहे, असे मला वाटत नाही. तरीही चौकशीत सत्य नाही सांगितले तर समस्या होऊ शकते.  

 

व्हाइस प्रेसिडेेंटना हटवण्याची पद्धत कोर्टाने चुकीची ठरवली  

कॅनडाच्या न्यायालयाने या वर्षी वॉलमार्टकडून एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याला हटवण्याच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवत ५ कोटींचा दंड ठोठावला. गेल गॅलिया नावाची महिला २००२ मध्ये कंपनीत रुजू झाली होती. तिचे कामाचे कौतुक करताना कंपनीनेे लवकर पदोन्नती दिली व २००८ मध्ये उपाध्यक्ष केले. जानेवारी २०१० मध्ये वॉलमार्ट कॅनडाच्या सीईओने सांगितले की, तुमचे काम चांगले आहे, मात्र कंपनीला तुमची आवश्यकता नाही. त्यामुळे महिलेस कोर्टात जावे लागले.

बातम्या आणखी आहेत...