आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google ने रिजेक्ट केले नसते तर आज Flipkart ही नसते, बन्सल यांनी सांगितली कंपनीची जन्मकथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे को फाऊंडर बिन्नी बन्सल यांनी दोन वेळा गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. दोन्हीवेळा ते रिजेक्ट झाले. त्यानंतर त्यांनी काहीतरी मोठे करण्याचा निर्णय घेतला आणि फ्लिपकार्ट सुरू झाले. एका कार्यक्रमात त्यांनी करिअरबाबत अनेक किस्से सांगितले. ते म्हणाले की, पत्नीला फ्लिपकार्टवर  खरेदी करण्यासाठी तयार करणे हे मोठ्या आव्हानासारखे आहे. ती रोज बिगबास्केटवर फळे आणि भाज्या खरेदी करत आणि मी म्हणतो, फ्लिपकार्टचे नवे फिचर्स ट्राय करा. 


2006 मध्ये बिन्नी अमेझॉनमध्ये सिनिअर सॉफ्टवेयर इंजिनीअर बनले 
एक रंजक किस्सा सांगताना बन्सल म्हणाले, माझा रेफरन्स दिल्याने सचिनला अमेझॉनकडून मोठा बोनस मिळाला होता. पण मी 8 महिन्यात नोकरी सोडली आणि सचिनला बोनस परत करावा लागला. सचिन आणि बिन्नी यांनी एकत्रितपणे अमेझॉनमध्ये काम करताना फ्लिपकार्टची प्लानिंग केली होती. 2007 मध्ये त्यांनी याचे लाँचिंग केले. 

 
घरोृघरी जात डिलिव्हरी दिली, लोकांनी ओळखलेही नाही 
फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेल्सशी संबंधित किस्से सांगतांना बिन्नी म्हणाले की, ग्राहकांची आवड निवड समजण्यासाठी सचिन आणि मी घरो-घरी जात सामानाची डिलिव्हरी केली. काही लोक तर आम्हाला ओळखूही शकले नाहीत. ज्यांनी ओळखले त्यांनी फोटो काढले. एक ग्राहक तर मला जाऊच देत नव्हता. त्यांच्या कुटुंबातील लोकही माझ्याशी बोलले. मग चहा पाणी झाले. त्यानंतर मला समजले ग्राहक हेच सर्वकाही आहे. त्यांना नकार देता कामा नये. 


योगायोगाने आयआयटीत प्रवेश 
बिन्नी यांनी सुरुवातीच्या जीवनाबाबत सांगताना म्हटले की, स्पोर्ट्समध्ये त्यांना रस होता. अभ्यासात ठिक होते, पण आयटीत जाणे धक्कादायक होते. आयआयटी दिल्लीतील दिवस जीवनातील सर्वात आनंदी होते, असेही ते म्हणाले. त्याठिकाणचे हॉस्टेल कल्चर सुंदर आहे. स्पोर्ट्स इव्हेंट आणि कल्चरल अॅक्टीव्हिटीजमध्ये प्रचंड स्पर्धा असायची. 

बातम्या आणखी आहेत...