आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिन्यांपूर्वी 1.15 लाख कोटींत फ्लिपकार्ट विकणारे बिन्नी बन्सल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि ग्रुप सीईओ बिन्नी बन्सल यांनी राजीनामा दिला आहे. बिन्नी यांच्या जागी कल्याण कृष्णमूर्ती ग्रुप सीईओ असतील. बिन्नींवर लैंगिक शोषणाचे आरोप होते. बिन्नी यांनी आरोपांचा इन्कार केला होता. कंपनीनेही चौकशीत आरोप सिद्ध झाले नसल्याचे म्हटले आहे. मात्र, या प्रकरणात बिन्नी यांनी पारदर्शकता ठेवली नाही म्हणून कंपनीने राजीनामा मंजूर केला. बिन्नींची कंपनीत ५ % भागीदारी कायम राहील. कंपनी बोर्डाचे ते सदस्य राहतील. फ्लिपकार्टचे ७७% भाग १.१५ लाख कोटींत खरेदी करणाऱ्या वॉलमार्टनुसार, आरोप करणारी महिला याच कंपनीची माजी कर्मचारी आहे. गेल्या जुलैमध्ये ही तक्रार करणारी महिला आता स्वतंत्र व्यवसायात आहे. 

 

मी आणखी काही महिने राहणार होतो. मात्र, वैयक्तिक घटना अशा घडल्या की मला निर्णय घ्यावा लागला. माझ्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. मात्र, स्वतंत्र लॉ फर्मने हे अारोप निराधार ठरवले आहेत. मी पण हे आरोप फेटाळले आहेत. माझ्या कुटुंबासाठी हा कसोटीचा काळ आहे. मी कंपनीच्या बोर्डावर मात्र सध्या कायम राहीन. 

 

फ्लिपकार्टमध्ये आता बिन्नी यांची सक्रिय भूमिका नाही

कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये बिन्नी बन्सल यांनी आपण कंपनीचे भागधारक राहणार असल्याचे म्हटले आहे. सूत्रांनुसार, सर्व विभागाचे वेगवेगळे व्हर्टिकल सीईओ असल्यामुळे या कंपनीत आता बिन्नी यांची कोणत्याही प्रकारची सक्रिय भूमिका राहिलेली नाही.

 

सचिन अगाेदरच वेगळे झाले : जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी असलेल्या अमेरिकेच्या वॉलमार्टने फ्लिपकार्ट १.१५ लाख कोटींत (७७%) खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर सहसंस्थापक सचिन बन्सल भाग विकून वेगळे झाले.

 

मिंत्रा, जाबोंगचे अधिकारी कृष्णमूर्तींना रिपोर्ट करणार
बिन्नींची जागा घेणारे कृष्णमूर्ती आता मिंत्रा आणि जाबोंगच्या विभागाचीही जबाबदारी सांभाळतील. या कंपन्यांचे सीईओ अनंत नारायण हे मात्र कृष्णमूर्तींना रिपोर्ट करतील. फोनपेची जबाबदारी समीर निगम यांच्याकडेच कायम राहील. ते कंपनीच्या कार्यकारी मंडळाला रिपोर्टिंग करतील.

 

बातम्या आणखी आहेत...