आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बायो CNG प्लँट उभारून सुरू करा व्यवसाय; होईल लाखोंची कमाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अॅग्री क्षेत्राशी संबंधित नाफेड (NAFED)ने कुजलेल्या पदार्थांपासून बायो सीएनजी (BIO CNG)तयार करण्यासाठी देशभरात 100 प्लँट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाफेड प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन तुम्हीही सीएनजी प्लँट उभारून व्यवसाय सुरू करु शकता. बायो सीएनजी गाय-म्हशींसह इतर जनावरांच्या मल-मुत्रापासून, खराब झालेल्या भाजीपाला-फळांपासून तयार करतात. परंतू हा गॅस तयार करण्यासाठी वेगवेगळ्या मशिनरी वापरल्या जातात. 

 

याप्रकारे तयार होतो बायो सीएनजी
सध्या महाराष्‍ट्रासह, पंजाब हरियाणा आणि अनेक राज्यांमध्ये बायो सीएनजीचे प्लँट आहे. या सर्व प्लँटमध्ये VPSA (Vacuum Pressure Swing Adsorption) टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. या माध्यमातून जनावरांच्या मल-मुत्रापासून मिथेन तयार करतात. त्यानंतर तयार झालेल्या मिथेनला कॉम्प्रेस करून सिलेंडरमध्ये भरतात. या सर्व प्लँटला बसवण्यासाठी थोडी मेहनत आहे. परंतू एकदा थोडीशी मेहनत घेतल्यानंतर तुम्हाला एक मजबूत कमाई स्त्रोत सुरू होऊ शकतो. आता मोदी सरकरानेही प्रदूषण कमी करण्यासाठी बायो सीएनजी प्रोजेक्टला बढावा देत आहे.

 

कीती होईल कमाई
दिवसेंदिवस बायो सीएनजीची मागणी मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सरकारनेही यात लक्ष घातले आहे. सुरवातीला थोडी गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही यापासून महिन्याला चांगली कमाई करु शकतात. त्याशिवाय बायोगॅस तयार झाल्यानंतर उरलेल्या खताला तुम्ही शेतकऱ्यांना विकून त्यापासूनही हजारोंचा नफा कमवू शकतात. 

 

काय आहे नाफेडची योजना
नाफेडचे अधिकारी संजीव यांनी सांगितल्यानुसार, नाफेडने इंडियन ऑईल कंपनीसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत कंपनी 48 रुपये प्रति किलो दराने जैव-सीएनजी खरेदी करेल. त्यासाठी मुजफ्फरनगर जिल्ह्यात 3 केंद्रांची उभारणी करण्यात आली असून बायो सीएनजीची निर्मिती करणे सुरू झाले आहे.