आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोमेट्रिक हजेरी थांबवली, सार्वजनिक कार्यक्रम टाळा - केंद्राचे निर्देश, कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 31 वर

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
मक्का | कोरोनाच्या भीतीमुळे सौदी अरेबियाने मक्कातील उमरा यात्रा स्थगित केली आहे. गुरुवारी काबातील मशीद परिसरात असा शुकशुकाट होता. - Divya Marathi
मक्का | कोरोनाच्या भीतीमुळे सौदी अरेबियाने मक्कातील उमरा यात्रा स्थगित केली आहे. गुरुवारी काबातील मशीद परिसरात असा शुकशुकाट होता.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा शुक्रवारी ३१ वर गेला. थायलंड-मलेशियाहून आलेल्या एकाला कोरोनाचे निदान झाले. जगभरात कोरोनामुळे ३,३४५ जणांचा मृत्यू, तर १ लाख रुग्ण आजारी आहेत.  काेरोना नियंत्रणात येईपर्यंत लोकांनी सार्वजनिक सभा-कार्यक्रमांत न जाण्याचा सल्ला केंद्राने दिला आहे. आयोजकांनाही कार्यक्रम रद्द किंवा स्थगिती करण्यास सांगितले आहे. संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद केली आहे. आता पूर्वीप्रमाणे रजिस्टरवर हजेरी लावली जाईल.  संसदेत ११ मार्चपासून लोकांना प्रवेश मिळणार नाही. 

लष्कराची सज्जता : लष्कराने आपल्या विविध लष्करी तळांवर १५०० लोकांना वेगळे ठेवण्याची व्यवस्था केली आहे. लष्कराने जैसलमेर, सुरतगड, सिकंदराबाद, चेन्नई आणि कोलकात्यात हे तळ उभारले आहेत. 

इराणहून भारतीयांना आणणार 
इराणमधील भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार तेथील प्रशासनासोबत चर्चा करत आहे. शुक्रवारी ३०० भारतीयांचे नमुने आणले जातील. इराणचे विमान दिल्लीतून भारतातील इराणींना परत नेणार आहे.

औरंगाबादेत प्रयोगशाळा सुरू करा 
महाराष्ट्रात कोरोनाचे नमुने तपासण्यासाठी पुण्यात एकच प्रयाेगशाळा अाहे. दुसरी प्रयोगशाळा औरंगाबाद येथे सुरू करण्यात यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केली.

बातम्या आणखी आहेत...