आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या पडद्यावर लवकरच अनुभवता येणार जयललिता यांचा जीवनप्रवास, तीन भाषांमध्ये येणार बायोपिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: तामिळनाडूच्या दिवगंत माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. त्यांचा बायोपिक येणार आहे. जयललिता यांनी सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची धूरा सांभाळली होती. जयललिता अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा होत्या. आपली राजकीय कारकिर्द योग्यरित्या सांभाळलेल्या जयललिता यांचा प्रवास आपल्याला मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. जय ललिता यांनी 5 डिसेंबर 2016 रोजी जगाचा निरोप घेतला होता. 

 

आयुष्यातील प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकणार
दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय यांनी जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जयललिता यांच्या जीवनातील चढउतार, त्यांची राजकीय कारकिर्द या साऱ्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. जयललिता यांचा बायोपिक हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती विब्री मीडिया प्रोडक्शनअंतर्गत करण्यात येणार आहे. लोकप्रिय राजकीय व्यक्तीमत्वांमध्ये जयललिता यांचं नाव कायमच अग्रस्थानी होतं. त्यांच्या याच लोकप्रियतेमुळे विजय यांनी हा बायोपिक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी या बायोपिकवर चर्चा सुरु असून या बायोपिकमध्ये कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

बातम्या आणखी आहेत...