आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bipasha Basu Is 8 Times More Rich Than Her Husband

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव-यापेक्षा 8 पटीने जास्त श्रीमंत आहे बिपाशा, तीन घरांची आहे मालकीण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 30 एप्रिल 2016 रोजी बिपाशा आणि करण साताजन्माच्या गाठीत अडकले. 'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली. हळूहळू मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बिपाशा ही करणची तिसरी पत्नी आहे. तर बिपाशाचे हे पहिलेच लग्न आहे. बिपाशापूर्वी श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट या टीव्ही अभिनेत्रींसोबत करणचे लग्न झाले होते. तर करणपूर्वी जॉन अब्राहम आणि हरमन बावेजा यांच्यासोबत बिपाशा रिलेशनशिपमध्ये होती.

 

तीन वर्षांनी लहान आहे बिपाशाचा पती... 
बिपाशा या इंडस्ट्रीत पती करणपेक्षा खूप सीनियर आहे. या दोघांच्या वयातदेखील अंतर आहे. बिपाशा करणपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर बिपाशाने चित्रपटांपासून ब्रेक घेतला आहे. ती अखेरची 'अलोन'(2015) मध्ये दिसली होती. यानंतर बिपाशाने कोणताच चित्रपट साइन केलेला नाही. बिपाशा करणपेक्षा संपत्तीमध्येही वरचढ ठरते. तिच्याकडे करणपेक्षा 8 पटीने संपत्ती जास्त आहे. networthier.com नुसार, बिपाशाचे नेटवर्थ जवळपास 100 कोटी रुपये आहे, तर तिच्या पतीचे एकूण नेटवर्थ फक्त 13.4 कोटी रुपये आहे.

 

(नोटः बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या संपत्तीचे आकडे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर...)

 

बॉलिवूडमध्ये अॅक्टिव नसतानादेखील बिपाशा कुठून करते एवढी कमाई, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...