आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bipasha Basu On Sajid Khan: Sonam Kapoor Co Star Amrita Puri Revealed I Was Warned To Stay Away From Sajid Khan

#METOO: आता बिपाशा बसूने केली साजिद खानची पोलखोल, साजिदच्या सेटवर महिलांचा असा व्हायचा छळ!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

MeToo प्रकरणात दररोज एकाहून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामध्ये भर पडत असून दिग्दर्शक साजिद खान याच्यावर आरोप करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा या दोघींनंतर आता अभिनेत्री बिपाशा बसू हिने साजिदवर आरोप केले आहेत. साजिद दिग्दर्शन करत असलेल्या ‘हमशकल’ चित्रपटाच्या सेटवर महिलांसाठी अपमानजनक वातावरण असायचे असे तिने म्हटले आहे. त्याच्या या वागण्यामुळे मी 2014 मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर राहीले. परंतु मी चित्रपटातील माझ्या भूमिकेबाबत आनंदी नसल्याची चुकीची चर्चा त्यावेळी केली गेली असेही ती म्हणाली.


बिपाशा म्हणते, साजिदच्या वागण्यामुळेच आपण चित्रपटाशी निगडित गोष्टींपासून दूर राहण्याचे ठरवले. यानिमित्ताने महिला अशाप्रकारच्या पुरुषांविरोधात आवाज उठवत आहेत ही अतिशय चांगली बाब आहे. तो सेटवर कायमच महिलांविषयी अतिशय वाईट विनोद करतो. तसेच तो सर्वच मुलींबाबत उद्धट वागतो असा आरोपही तिने केला. पण आपल्याला त्याच्याकडून थेट अशाप्रकारचा त्रास कधीही देण्यात आला नाही असेही तिने स्पष्ट केले. त्याच्या अशा चुकीच्या वागण्यानेच मी चित्रपटाशी निगडित गोष्टींपासून दूर राहील्याचे सेटवरील अनेकांना माहित होते.

 

अभिनेत्रीला मिळाला होता साजिदपासून दूर राहण्याचा सल्ला..
- सोनम कपूरसोबत 'आयशा' या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री अमृता पुरीने ट्वीट करुन सांगितले, "साजिद वाईट माणूस आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याचे महिलांसोबतचे वागणे अतिशय वाईट असते. मला अनेकांनी त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी माझा लोकांच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. पण आता इंडस्ट्रीतील अनेक लोक आणि त्याचे फॅमिली मेंबर्स हेच सांगत आहेत."

 

It was fairly well known that @SimplySajidK is a creep and is completely inappropriate as far as his conduct with women goes. I was warned to stay away from him if I ever came across him. I refuse to believe that it has come as a surprise to ppl from the industry or his family.

— Amrita Puri (@_Amrita_Puri) October 12, 2018

 

साजिदची बहीण म्हणाली, चुकीला माफी नाही..
दिग्दर्शक साजिद खानवर सुरू असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर पहिल्यांदाच त्याची बहीण आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान हिने प्रतिक्रिया दिली आहे. मी साजिदच्या वागण्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे फराह खानने म्हटलं आहे. नेहमीच आपल्या भावाच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या फराह खानने आता साजिदच्या कृत्याची ट्विटरवर निंदा केली आहे.

 

जे काही आरोप सुरू आहेत त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना खूपच दु:ख झाले आहे. माझे कुटुंब मानसिक धक्क्यातून जात आहे. जर माझ्या भावाने अशा प्रकारे असभ्य वर्तन केले असेल तर त्याला याची शिक्षा भोगावीच लागेल. माझ्या भावाच्या कोणत्याही कृतीचे मी समर्थन करत नाही. मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी उभी आहे, असे फराहने ट्विट करुन म्हटले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...