आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bipin Rawat Chief Of Defence Staff India | Bipin Rawat Army Chief General Named As India's First Chief Of Defence Staff

अण्वस्त्र वापराबाबत पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार असतील रावत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जनरल बिपिन रावत होणार देशाचे पहिले सीडीएस, ते ४ तारांकित अधिकारी राहतील
  • रावत कितीही व्यग्र असाे, या वयातही ते रोज ट्रेडमिलवर पळणे साेडत नाहीत

मुकेश कौशिक

नवी दिल्ली - जनरल बिपिन रावत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा सरकारने ही घोषणा केली.  विशेष म्हणजे सीडीएसच्या माध्यमातून अण्वस्त्र अधिकारात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील. अण्वस्त्राची कळ दाबण्याबाबत ते पंतप्रधान मुख्य लष्करी सल्लागार राहतील. २००३ मध्ये स्थापन अण्वस्त्र अधिकार प्राधिकरण (एनसीए) मध्ये १६ वर्षांनंतर हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 
अण्वस्त्र अधिकारात पंतप्रधानांच्या हाती दोन परिषदा होत्या. एक राजकीय आणि दुसरी कार्यकारी. अण्वस्त्र शस्त्राच्या वापराबाबत निर्णय राजकीय परिषद घ्यायची. राष्ट्रीय सुरक्षेवर टास्क फोर्सचे सदस्य आणि देशाचा अण्वस्त्र सिद्धांत लिहिणारे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांच्या मते, एनसीएमधील सीडीएसची भूमिका स्पष्ट झाल्याने अाता लष्करी सल्ल्याबाबतचा निर्णय योग्य हाती आला आहे. कधी कोणावर कोणते शस्त्र वापरायचे याचा योग्य निर्णय लष्करी नेतृत्वच घेऊ शकेल.  सीडीएस कार्यकारी परिषदेचे प्रशासन पाहतील आणि राजकीय परिषदेत ते विशेष निमंत्रित असतील. अण्वस्त्र शस्त्रांची जबाबदारी स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच पाहत आली आहे. यात आणि लष्करात एनएसए हे दुवा असत. आता ही भूमिका सीडीएसची राहील. पंतप्रधान आणि लष्कर यांच्यात सल्लामसलत करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची व्यवस्था होती. सीडीएससाठी वयोमर्यादा ६५ वर्षे आहे. रावत सध्या ६२ वर्षांचे आहेत. त्यामुळे ते सीडीएस पदावर तीन वर्षे राहू शकतात.रावत यांची ताकद ओळखा : रावत कितीही व्यग्र असाे, या वयातही ते रोज ट्रेडमिलवर पळणे साेडत नाहीत 


जनरल रावत यांच्याबराेबर अनेक दशके विविध अाघाड्यांवर काम केलेले एक लेफ्टनंट जनरल म्हणाले, रावत यांना तिन्ही लष्कराशी निगडित गाेष्टींची प्रदीर्घ जाण अाहे. तिन्ही लष्कर व संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी त्यांच्या गाेष्टी केवळ एेकतच नाहीत, तर त्याचा सन्मानही करतात. ते प्रत्येक कामाला प्राधान्य देतात,  पण घाई करीत नाहीत. ते चालढकल न करता यंत्रणेतील चुका शाेधत राहतात. भ्रष्टाचारात अाकंठ बुडालेल्या अनेक लाेकांना त्यांनी बिना पेन्शन घरी बसवले अाहे. रविवार असाे वा सुटीचा दिवस, ते काेणालाही भेटण्यास नकार देत नाहीत. यावरून समाज व लष्कराच्या प्रति असलेली त्यांची निष्ठा दिसून येते. जर ते एखाद्या दाैऱ्यावर गेले तर प्रशासकीय कर्मचाऱ्यांना न भेटता जात नाहीत.अधिकारी व तरुण यांच्यातील दरी दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत.  प्रसंगी संरक्षणमंत्र्यांची नाराजी पत्करून त्यांनी निवृत्त  सैनिकांचा प्रश्न स्पष्टपणे उपस्थित केला व त्यात यश मिळवले. जनरल रावत यांची मानसिक स्थिती इतकी भक्कम अाहे की,  धनादेशावर स्वाक्षरी करण्यासारखे गंभीर कामही ते एनएसए वा पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांशी चर्चा करताना करतात. युवा अधिकारी असताना एकदा गंभीर जखमी हाेऊनदेखील त्यांनी भक्कम वापसी केली व अाजही ते शारीरिकदृष्ट्या मजबूत अाहेत. कितीही व्यग्र असले तरी ते ट्रेडमिलवर पळण्याचे अापले राेजचे काम साेडत नाहीत. ते वर्षातून दाेन वेळा धार्मिक स्थळी जातात. एकदा हरसिलजवळच्या खाेल दरीत एक बस  पडली. त्या वेळी ते कॅप्टन हाेते. घटना कळताच ते तातडीने नदीजवळ पाेहोचले व अनेक प्रवाशांना वाचवले.
 

ले. जनरल नरवणे स्वीकारणार लष्करप्रमुखाचा कार्यभार 


लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे मंगळ‌वारी देशाचे २८ वे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. आता तिन्ही दलाच्या प्रमुख पदावर एनडीएच्या ५६ व्या बॅचचे अधिकारी आले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...