आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दोन नव्हे तब्बल 8 कलाकारांनी साकारली होती 'धडाकेबाज'मधली कवट्या महाकाळची भूमिका, हे होते कारण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला ‘धडाकेबाज’ हा चित्रपट नक्कीच तुमच्या लक्षात असेल. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अश्विनी भावे आणि दिपक साळवी या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील  गंगाराम आणि कवट्या महाकाळ या भूमिका सर्वाधिक गाजल्या होत्या. मुखवट्यामागे असलेल्या कवट्या महाकाळचा चेहरा मात्र प्रेक्षकांना दिसला नव्हता. ही भूमिका कुण्या एका कलाकाराने नव्हे तर तब्बल आठ जणांनी साकारली होती. याचा खुलासा महेश कोठारे यांनी काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावरुन केला होता. 

म्हणून आठ जणांनी साकारली होती भूमिका... 
संपूर्ण चित्रपटामध्ये मुखवटा घालून वावरणाऱ्या कवट्या महाकाळची भूमिका सर्वप्रथम बिपीन वर्ती या कलाकाराने साकारली होती. बिपीन वर्ती हे अभिनेत्यासोबतच दिग्दर्शकही आहेत. त्यांनी  ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘चंगू मंगू’ आणि ‘डॉक्टर डॉक्टर’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. बिझी शेड्युलमुळे बिपीन यांना 'धडाकेबाज'साठी तारखा देणे शक्य झाले नव्हते. म्हणून त्यांनी अर्ध्यावरच हा चित्रपट सोडला होता. अखेर वेगवेगळ्या कलाकारांकडून महेश कोठारेंनी कवट्या महाकाळची भूमिका करुन घेतली. पण ही भूमिका वठवणा-या इतर सात कलाकारांची नावे पुढे आलेली नाहीत. संपूर्ण चित्रपटासाठी बिपीन वर्ती यांनीच व्हाइस ओव्हर दिला होता.  

बातम्या आणखी आहेत...