आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुकेने व्याकुळ झालेल्या पिलाच्या चोचीत आईऩे भरवला सिगरेटचा तुकडा, इंटरनेटवर फोटो झाला व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तल्लाहसी - फ्लोरिडा येथील समुद्रकिनारी एक पक्ष्याने आपल्या पिलाला सिगरेटचा तुकडा खाऊ घालत असल्याचा फोटो समोर आला आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा फोटो लार्कोच्या करेन मेसन यांच्या कॅमेरातून टिपण्यात आला आहे. तिनेच हा फोटो आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला. आता हा फोटो जगभरात व्हायरल होत आहे. करेनने फोटो शेअर करत विनंती केली आहे की, तुम्ही सुमद्रकिनाऱ्याला तुमचा अॅश ट्रे समजू नका. 

 

स्थानिक रिपोर्ट्सच्या मते, हा फोटो एक आठवड्यापूर्वी पाइनलाज काउटच्या सेंट पीट्स बीचवर काढण्यात आला होता. करेन म्हणाली, पक्षी आपल्या पिलाच्या चोचीत काहीतरी भरवत असल्याचे मी पाहिले, ते मासा नसल्याचे मला समजले. पण ते नेमकं काय होते हे तेव्हा मी सांगू शकले नाही. फोटो घेतल्यानंतर ती आपल्या घरी गेली आणि कॉम्प्युटरवर या फोटोला चांगल्या प्रकारे बघितले. तेव्हा तो एक सिगरेटचा तुकडा असल्याचे तिला कळाले.


 

बातम्या आणखी आहेत...