आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतदया : सिन्नरमधील ५० फूट उंच टॉवरवर चढून पक्षीमित्रांनी दिले करकोचाला जीवदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - पोलिस स्टेशनच्या आवारातील ५० फूट उंचीच्या वायरलेस टॉवरवर अडकलेल्या करकोचाला पक्षीमित्रांनी जीवदान देण्याची घटना रविवारी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. हवालदार विनोद टिळे, संजय गंगावणे, विकी वरंदळ यांच्या प्रयत्नानंतर या पक्ष्याची मरणाच्या दारातून सुटका झाली. 


सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिन्नर पोलिस स्टेशनच्या आवारातील वायरलेस टॉवरवर अडकलेल्या करकोचाला कावळे आणि इतर पक्षी कालवा करत वाचवण्याची धडपड करत होते. हवालदार विनोद टिळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी रंगकर्मी संजय गंगावणे, गोरक्षक विकी वरंदळ यांना भ्रमणध्वनी करुन घटनास्थळी बोलावून घेत तातडीने मदत कार्य सुरु केले. वरंदळ आणि गंगावणे दोघेही ५० फूट उंच टॉवरवर भरभर चढून गेले. मात्र तेथे कावळ्यांसह इतर पक्ष्यांनी त्यांच्यावरच झडप मारत मदत कार्यात अडथळे आणल्याने या पक्ष्याची सुटका करणे अवघड होवून बसले होते. मात्र एकाने हाताने इशारे करत पक्ष्यांना हुसकावले तर दुसऱ्याने थेट टॉवरचे टोक गाठत अँगलमध्ये चोच अडकलेल्या करकोचाची महत्प्रयासाने सुटका केली. बंदाच्या पिशवीमध्ये टाकून या करकोचाला खाली आणण्यात आले. रक्तबंबाळ झालेल्या या करकोचाची चोच अँगलमध्ये अडकल्याने मध्यभागी वाकली होती. खाली येताच त्याला पाणी व काही काळानंतर चिकनचे बारीक पीस खावू घालून त्याची भूकही क्षमविण्यात आली. पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्याने डॉ. काळे यांच्याकडे नेवून त्याच्यावर उपचार करण्यात आले. आज सकाळी त्यास वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...