आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birender Singh Dhanoa, Former Air Force Chief On Pakistan Terror Camps Over 2001 Parliament And 2008 Mumbai Attacks

26/11 आणि संसद हल्ल्यानंतर दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायचे होते, पण सरकारने दिली नाही मंजुरी : माजी हवाईदल प्रमुख

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसोबत माजी हवाईदल प्रमुख बी.एस. धनोओ (फाइल फोटो) - Divya Marathi
विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसोबत माजी हवाईदल प्रमुख बी.एस. धनोओ (फाइल फोटो)
  • सप्टेंबरमध्ये निवृत्त झालेले हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली
  • 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाला तर 2008 मध्ये मुंबईला दहशतवाद्यांनी हादरून सोडले होते

चंडीगड - देशातील दोन मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाला पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करायच्या होत्या, परंतु तत्कालीन सरकारने मंजुरी दिली नाही असा गौप्यस्फोट माजी हवाईदल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी शनिवारी केला. धनोआ 31 डिसेंबर 2016 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत हवाईदल प्रमुख होते. धनोआ या आधीही म्हणाले आहेत की पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी हवाई दल तयार होते पण राजकीय नेतृत्वाने परवानगी दिली नव्हती. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्राच्या मंजुरीनंतर बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक केल्याचे त्यांनी सांगितले. 
एअरचीफ मार्शल धनोआ यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले की, 2001 मध्ये संसद आणि जम्मू-काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. त्यानंतर 26/11/2008 मध्ये मुंबईला निशाणा करण्यात आले. हा हल्ला 26/11 नावाने ओळखला जातो. या दोन मोठ्या हल्ल्यांनंतर भारतीय हवाईदलाने पीओकेतील दहशतवादी छावण्या नेस्तनाबूद करण्याची योजना तयार केली होती. दोन्ही वेळेस केंद्र सरकारसमोर ठेवण्यात आला होता. परंतु दोन्ही वेळेस मंजुरी मिळाली नाही. 2001 मध्ये एनडीए सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि 2008 मध्ये यूपीए सरकारमध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते.  आम्ही पाकिस्तानपेक्षा बरेच पुढे होतो


धनोआ यांच्या मते, मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन एअरफोर्स प्रमुख पीओकेत हल्ला करण्यासाठी तयार होते. तांत्रिकदृष्ट्या आम्ही शत्रूपेक्षा बरेच पुढे होतो. हवाईदल हल्ल्यासाठी नेहमीच तयार असते. आमच्याकडे तितकी क्षमता देखील आहे. मात्र अंतिम निर्णय तर सरकार घेते. पुलवामामध्ये आपल्या सैनिकांवर दहशतवादी हल्ला झाला. यानंतर आम्ही पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक केली. सरकारने मंजुरी दिल्यामुळेच हे शक्य झाले. 

बातम्या आणखी आहेत...