Home | News | Birthday: Actor Kamal Hassan Affairs And His Controversial Life

B'day: 2 लग्न, 2 अफेअर आणि एक लिव-इन रिलेशन, असे आहे कमल हासन यांचे खासगी आयुष्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:00 AM IST

बॉलिवूडमध्ये त्यांनी 'एक दुजे के लिए' या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते.

  • Birthday: Actor Kamal Hassan Affairs And His Controversial Life

    एन्टरटेन्मेंट डेस्कः साऊथचे सुपरस्टार कमल हासन यांनी वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. 7 नोव्हेंबर 1954 रोजी परमकुडी, चेन्नईत त्यांचा जन्म झाला. 1959 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. 'अपूर्व रागंगल' हा त्यांचा पहिला लीड हीरो असलेला सिनेमा होता. यामध्ये त्यांनी त्यांच्या वयापेक्षा मोठ्या स्त्रीच्या प्रियकराची भूमिका वठवली होती.

    या सिनेमाद्वारे झाली बी टाऊनमध्ये एन्ट्री...
    बॉलिवूडमध्ये त्यांनी 'एक दुजे के लिए' या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते. हा सिनेमा यशस्वी ठरला होता. त्यानंतर त्यांनी 'सागर', 'गिरफ्तार', 'जरा सी जिंदगी', 'राज तिलक', 'एक नई पहेली', 'देखा प्यार तुम्हारा', 'चाची 420', 'हे राम', 'विश्वरूपम्' यांसह ब-याच हिंदी सिनेमांत अभिनय केला होता. कमल यांनी 1978 साली वाणी गणपतीसोबत पहिले लग्न केले होते. दहा वर्षे हे लग्न टिकले आणि 1988 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अभिनेत्री सारिकाची त्यांच्या आयुष्यात एन्ट्री झाली. कमल आणि सारिका यांनी 1988 मध्ये लग्न केले. त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. 2004 मध्ये कमल सारिकापासूनही विभक्त झाले.

    कमल हासन यांच्या आयुष्यात सारिकापूर्वी आणि नंतर आल्या या महिला...
    साऊथचे सुपरस्टार आणि बॉलिवूड अॅक्टर कमल हासन आणि गौतमी तडिमल्ला विभक्त झाल्याची बातमी अलीकडेच आली आहे. स्वतः गौतमीने ट्विटर आणि ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली. कमल हासन यांच्या आयुष्यात सारिकापूर्वी आणि नंतर आल्या या स्त्रिया...
    श्रीविद्या- 70च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबत कमल हासन यांचे अफेअर होते. दोघांनी काही सिनेमेसुद्धा एकत्र केले होते. मात्र फार काळ दोघांचे अफेअर टिकले नाही.

    - वाणी गणपती
    1978 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी कमल हासन यांनी डान्सर वाणी गणपतीसोबत लग्न केले. हे नाते दहा वर्षे टिकले आणि नंतर सारिकाच्या एन्ट्रीमुळे हे नाते संपुष्टात आले.

    - सारिका
    वाणीपासून विभक्त झाल्यानंतर 1988 मध्ये कमल हासन सारिकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मुलगी श्रुतीच्या जन्मानंतर दोघांनी लग्न केले.

    - सिमरन
    एका काळानंतर सारिकासोबतसुद्धा कमल यांचे पटेनासे झाले. 2004 मध्ये सारिकासोबत कमल यांनी घटस्फोट घेतला. याकाळात सिमरन बग्गा जी कमल यांच्यापेक्षा वयाने 22 वर्षांनी लहान होती, तिच्यासोबत काही काळ त्यांचे रिलेशन होते.

    पुढील स्लाईडमध्ये वाचा, वादात राहिले कमल हासन यांचे खासगी आयुष्य..

  • Birthday: Actor Kamal Hassan Affairs And His Controversial Life

    वादात राहिले पर्सनल लाइफ...

    फिल्मी करिअरमध्ये यशोशिखर गाठणारे कमल हासन यांच्या खासगी आयुष्याला मात्र वादाची झालर राहिली आहे. गेली 13 वर्षे त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या अभिनेत्री गौतमीने मागील वर्षी त्यांच्यापासून विभक्त झाल्याची घोषणा केली होती. या दोघांचे नाते संपुष्टात का आले, याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. 
     
    पुढील स्लाईड्समध्ये बघा, कमल हासन यांचे बालपणीपासून ते आत्तापर्यंतचे निवडक फोटोज...  
     
Trending