आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजीएफ फेम स्टार यशच्या बर्थडेला फॅन्सने कापला 5000 किलोग्रामचा केक, वर्ल्ड रेकॉर्ड बनवला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : केजीएफ फेम सुपरस्टार यशने 8 जानेवारीला बंगळुरूमध्ये 34 वा वाढदिवस साजरा केला. फॅन्सने त्याचे 216 फूट कटआऊट लावले. तसेच 5000 किलोग्रॅमचा केक कापून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. हा केक 20 लोकांनी सुमारे 96 तासांमध्ये बनवला. 


वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट पवन सोलंकीने जगातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटी बर्थडे केकचे सर्टिफिकेट दिले आहे. यश दोन वर्षानंतर आपला वाढदिवस साजरा करत आहे. कारण वाढदिवसाच्या दिवशी एका फॅनने आत्महत्या केली होती. यानंतर 2019 मध्ये तो केजीएफच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याच्या कारणाने आपला वाढदिवस साजरा करू शकला नव्हता. केजीएफने 250 कोटींचा बिजनेस केला होता. जो कन्नड फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासात सर्वात जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला. 

केक 40 फूट लांब होता... 

  • देशभरातून आलेले यशचे फॅन्स 'रॉकिंग हब्बा' नावाच्या इव्हेंटसोबत एकत्र आले होते. 5000 किलोचा हा सर्वात मोठा केक आहे, जो वेणु गोवडाने बनवला.
  • 40 फूट लांब आणि 70 फूट रुंद हा केक बनवण्यासाठी 50 किलो सुक्या मेव्याव्यतिरिक्त 1800 किलो पीठ, 1500 किलो साखर, 1750 किलो बटर क्रीम आणि 50 किलो तूप यांसोबतच 22,500 अंड्यांचा उपयोग झाला आहे. केक यशच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर 7 जानेवारीला तयार केला गेला होता.
बातम्या आणखी आहेत...