आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील गॉर्जिअस अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. 23 नोव्हेंबर 1984 रोजी तिचा जन्म झाला. अमृताचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात झाले. अमृताने मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. शिवाय मराठी टेलिव्हिजनवर काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे. अमृताला एक थोरली बहीण आहे. अमृताचे लग्न अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत झाले आहे. लग्नानंतरही अमृताने काम सुरु ठेवले आहे.
मराठीतील देखण्या अभिनेत्रींपैकी अमृता एक आहे. साडीत ती जेवढी सोज्वळ दिसते तितकीच वेस्टर्न आउटफिटमध्ये चाहत्यांना हॉट वाटते. इंडियन आणि वेस्टर्न असे दोन्ही आउटफिट ती उत्कृष्टरित्या कॅरी करते. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, अमृताची ग्लॅमरस झलक दाखवणारी खास छायाचित्रे... अमृताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता तिची दिलखेचक छायाचित्रे बघायला मिळतात.
‘गोलमाल’, ‘साडे माडे तीन’, ‘गैर’, ‘अर्जुन’, 'झकास', 'सतरंगी रे', 'शाळा', ‘बाजी’, ‘वेलकम जिंदगी’, ‘कट्यार काळजात घुसली’, 'वन वे टिकिट' यासह अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये अमृताने आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही अमृताने ओळख निर्माण केली आहे. ‘फुंक’ , ‘फुंक 2’, ‘राजी’, ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांध्ये ती झळकली. तर आगामी 'मलंग' या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे.
बर्थडे गर्ल अमृताची खास छायाचित्रे बघून तुमच्या तोंडून निघेल केवळ हेच शब्द इट्स सो हॉट...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.