आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Of Lord Jesus In 160 Countries: Victims In Sri Lanka Blasted Church, Breaking Two Centuries Of Tradition In Paris, 'Jingle Bell' Of Indian Soldiers

160 देशांत प्रभू येशूंचा जन्मोत्सव : श्रीलंकेत पीडित लोक स्फोट झालेल्या चर्चमध्ये, पॅरिसमध्ये दोन शतकांच्या परंपरेला छेद, भारतीय जवानांचे 'जिंगल बेल'

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
कोलंबो - छायाचित्र श्रीलंकेच्या कोलंबो येथील सेंट सेबेस्टियन चर्चजवळील सजावटीचे आहे. - Divya Marathi
कोलंबो - छायाचित्र श्रीलंकेच्या कोलंबो येथील सेंट सेबेस्टियन चर्चजवळील सजावटीचे आहे.

कोलंबो/ लंडन/ व्हेनिस : जगभरात बुधवारी ख्रिश्चन समुदायाने उत्साहात नाताळ साजरा केला. १६० हून जास्त देशांत मंगळवारी रात्रीपासूनच प्रार्थनांचे सत्र सुरू झाले होते. मेणबत्ती उजळवून आणि कॅरोल्सच्या स्वरात लोकांनी प्रभू येशूचे स्वागत केले. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरियात मोठे ख्रिसमस ट्री सजवण्यात आले होते. हजारो लोक बेथलहेममध्ये पोहोचले होते. पॅरिसमध्ये २०० वर्षांत पहिल्यांदाच नोट्रे डेममध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला प्रार्थना झाली नाही. फिलिपाइन्समध्ये वादळ व व्हेनिसमध्ये पुरामुळे नाताळ साजरा करण्यात आला नाही. अमेरिका : व्हाइट हाऊससमोर ख्रिसमस ट्रीची सजावट करण्यात आली हाेती. त्याला पाहण्यासाठी व त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी हजारो लोक पोहोचले होते.

बॉम्बस्फोटात वाचलेल्या लोकांनी केली प्रार्थना... 

कोलंबो : श्रीलंकेत ईस्टरला झालेल्या स्फोटात वाचलेल्या लोकांनी सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना केली. एप्रिलमध्ये तीन चर्चमध्ये स्फोट झाला होता. त्यापैकीच हे एक आहे.

लाखो मेणबत्त्या उजळल्या...

इंडोनेशिया : पूर्व जावामध्ये सुराबायाच्या एका चर्चमध्ये रात्री १२ वाजता सामूहिक मेणबत्ती उजळवण्यात आली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

बर्फापासून सँटा व्हिलेज... 

फिनलंड : रोव्हिनिएमी सांताक्लॉज व्हिलेज नावामुळे चर्चेत आले आहे. यंदा नाताळनिमित्त येथे बर्फापासून गाव साकारण्यात आले आहे.

मोठा सजवलेला ख्रिसमस ट्री... 

इटली : गब्बिया भागात जगातील सर्वात मोठा सजवलेला ख्रिसमस ट्री आहे. १९८१ मध्ये माउंट इंगिनोपासून या परंपरेला सुरुवात झाली होती.

एलओसीवर जवानांचा प्रश्न... 

काश्मीर : एलआेसीवर बर्फवृष्टीदरम्यान भारतीय लष्करातील जवानांनी जिंगल बेलचे गायन केले. त्याशिवाय सांताक्लॉजसोबत नृत्यही केले.

बातम्या आणखी आहेत...