आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday: Ranbir Kapoor Searching His First Wife Who Got Married With His Bungalow Gate

रणबीर अजुनही करतोय पहिल्या पत्नीची प्रतिक्षा, स्वतः केला हा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणबीर कपूर 28 सप्टेंबर रोजी 36 वर्षांचा झाला आहे. रिपोर्टनुसार, रणबीर सध्या आलिया भटला डेट करतोय. परंतु खुप कमी लोकांना माहिती असेल की, एका मुलीने रणबीरला पती मानले आहे. IIFA-2018 च्या वीकेंड स्टोरीच्या मुलाखतीत स्वतः रणबीर कपूरने हा खुलासा केला. ही मुलगी दुसरी कुणी नसून रणबीरची खुप मोठी चाहती आहे. रणबीरने सांगितले की, "जेव्हा मी आई-बाबांसोबत त्यांच्या घरात राहत होतो, तेव्हा एक फॅन आमच्या घरी आली होती. त्यावेळी मी घरी नव्हतो, पण ती संपुर्ण नवरीच्या वेशात घरी आली होती आणि ब्राम्हणालाही सोबत घेऊन आली होती. मला आजपर्यंत कळाले नाही की, ती फॅन कोण होती, कारण मी तेव्हा तिला भेटू शकलो नव्हतो." मुलाखती दरम्यान रणबीर म्हणाला होता की, जर ती आयफा वीकेंड स्टोरी पाहत असेल तर मला फोन कर कारण आफ्टऑल तिच माझी पहिली पत्नी आहे.

 

7वी क्लासमध्ये बनली होती रणवीरची पहिली गर्लफ्रेंड 
- रणबीर जेव्हा 7 वीत होता तेव्हा त्याची पहिली गर्लफ्रेंड बनली होती. परंतु तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरने ठरवले होते की, तो पुन्हा प्रेमात पडणार नाही. तरीही आतापर्यंत त्याचे असे 5 अफेअर्स झाले आहेत, जे सर्वांना माहिती आहेत. आज नजर टाकूया त्याच्या गर्लफ्रेंडच्या लिस्टवर...


अफेअर नंबर 1
रणबीर आणि अवंतिका मलिक 


अवंतिका मलिक आता इमरान खानची पत्नी आहे आणि दोघांना एक मुलगी इमारा आहे. लग्नापुर्वी अवंतिका रणबीरची गर्लफ्रेंड होती. जेव्हा ती 'जस्ट मोहब्बत'मध्ये अॅक्टिंग करत होती, तेव्हा रणबीर तिच्या प्रेमात होता. तो तिला भेटण्यासाठी नेहमीच शोच्या सेटवर जायचा. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. परंतु नंतर अवंतिकाने इमरानसोबत लग्न केले.

 

अफेअर नंबर 2 
रणबीर आणि सोनम कपूर 

रणबीरची दूसरी गर्लफ्रेंड सोनम कपूर होती. रणबीर आणि सोनमने 'सांवरिया'(2017) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. दोघांमध्ये शूटिंग दरम्यान जवळीक वाढली. त्याच्या जवळच्या सुत्रांनी सांगितले की, रणबीर आणि सोनमला त्याचे रिलेशनशिप पब्लिकली करायचे नव्हते. परंतु नंतर त्याचे ब्रेकअप झाले. 

 

अफेअर नंबर 3 
रणबीर आणि नंदिता मेहतानी 

नंदिता मेहतानी बिझनेसमन संजय कपूरची पहिली पत्नी आहे. संजयने नंतर नंदिताला सोडून करिश्मा कपूरसोबत लग्न केले होते. तर संजयसोबत नाते मोडल्यानंतर नंदिताचे नाव रणबीरसोबत जोडण्यात आले होते. परंतु त्यांचे अफेअर जास्त काळ टिकले नाही. 

 

अफेअर नंबर 4
रणबीर आणि दीपिका पदुकोण 

रणबीरच्या लिस्टमध्ये पुढचे नाव दीपिका पदुकोणचे आहे. या दोघांचे दिर्घकाळ अफेअर होते. दोघांनी 'बचना ए हसीनों'(2008) चित्रपटात एकत्र काम केले होते. दोघंही जवळ आले. दीपिका रणबीरसोबतच्या रिलेशनशिपविषयी खुप सिरियस होती. तिने तिच्या मानेवर रणबीरच्या नावाचा टॅटूही काढला होता. दीपिका जेव्हा रणबीरपासून वेगळी झाली, तेव्हा तिने करणच्या शोमध्ये रणबीरची खुप खिल्ली उडवली होती. 


अफेअर नंबर 5
रणबीर आणि कतरिना कैफ 

'अजब प्रेम की गजब कहानी'(2009) मध्ये रणबीर कपूर आणि कतरिना कैफमध्ये जवळीक वाढली. तोपर्यंत रणबीरच्या आयुष्यात दीपिकासाठी स्थान होते. तर करतिनाचे नाव सलमानसोबत जोडले गेले होते. रणबीर-कैटच्या रिलेशनशिपचा खुलासा त्यांच्या बीचवरील फोटो समोर आल्यामुळे झाला. परंतु या फोटोनंतरही ते त्याच्या रिलेशनशिपविषयी काहीच बोलले नाहीत. परंतु रणबीर आणि कतरिानेच 2016 मध्ये ब्रेकअप झाले. 
 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...