आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 वर्षानंतर आता अशी दिसतेय मराठमोळी शिल्पा शिरोडकर, 90 दशकाची होती बोल्ड अभिनेत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आज 49 वर्षाची झाली आहे. 20 नोव्हेंबर 1969 रोजी शिल्पाचा मुंबईत मराठी कुटुंबात जन्म झाला. शिल्पाने सात वर्षाअगोदर 2010 साली आलेल्या बारुद या चित्रपटात शेवटचे काम केले होते. गेल्यावर्षी शिल्पाला बॉलिवूड स्टायलिस्ट शाईना नाथच्या मेहंदी सेरेमनीमध्येही पाहण्यात आले होते. तिथे तिला ओळखणे कठिण झाले होते. 27 वर्षापूर्वी 1990 मध्ये रिलीज झालेला चित्रपट किशन कन्हैयामध्ये बोल्ड अवतारात दिसली होती. आता शिल्पाच्या लुकमध्ये फारच बदल झाला आहे.

 

18 वर्षापूर्वी NRI बँकरसोबत केले लग्न....

- 11 जुलै 2000 साली शिल्पाने यूके येथील बँकर अपरेश रंजीतसोबत लग्न केले. 2003 साली तिने मुलगी अनुष्काला जन्म दिला. शिल्पाची मुलगी आता 15वर्षाची झाली आहे. 
- शिल्पाने टीव्ही शो एक मुठ्ठी आसमानमध्ये मुख्य भूमिका केली होती. त्यानंतर तिने स्टार प्लसचा शो 'सिलसिला प्यार का' मध्येही काम केले होते.


मराठी चित्रपटांची केली आहे निर्मिती..

शिल्पा शिरोडकरने ऑरेंज ट्री या नावाने प्रोडक्शन कंपनी सुरु केली आहे. या बॅनरखाली शिल्पाने 'सौ. शशी देवधर' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.


पुढच्या स्लाईडवर वाचा, बोल्ड अभिनेत्रीनंतर आता निभावतेय आईचा रोल..

 

 

बातम्या आणखी आहेत...